भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पुढील आठवड्यापासून ४ सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळला जाणार आहे. या ट्रॉफीचा इतिहास पाहिला तर याची सुरुवात १९९६-९७ पासून सुरू झाली. बॉर्डर गावसकर मालिकेतील सर्वात मोठा विक्रम हा एमएस धोनीच्या नावावर आहे.

टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, एमएस धोनीने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या एकूण १३ कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे. यापैकी त्यांनी ८ जिंकले आहेत. दोन्ही देशांच्या कर्णधाराचा या ट्रॉफीतील हा सर्वाधिक विजय आहे. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ आणि मायकेल क्लार्क यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी प्रत्येकी पाच विजय मिळवले आहेत.

यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांचा क्रमांक लागतो. या यादीत टीम इंडियाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२०-२१ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवला होती.

हेही वाचा – SA20: जॉन्टी ऱ्होड्सच्या ‘त्या’ कृत्तीने जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO होतोय व्हायरल

बॉर्डर-गावसकर मालिकेवर भारताचे वर्चस्व –

१९९६-९७ पासून सुनील गावसकर आणि अॅलन बॉर्डर यांच्या नावाने ही मालिका सुरू झाली. भारताने या ट्रॉफीमध्ये एकूण ९ वेळा ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवले आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने ६ वेळा आयोजन केले आहे. भारतीय संघ १५ पैकी ९ वेळा मालिका विजेता ठरला आहे, तर कांगारू संघ फक्त ४ वेळा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा करू शकला आहे. २००३-०४ मध्ये ही मालिका १-१अशी बरोबरीत सुटली होती. यादरम्यान एकूण ५२ सामने झाले आहेत, त्यापैकी भारताने २२ आणि ऑस्ट्रेलियाने १९ जिंकले आहेत. तर ११ सामने अनिर्णित राहिले आहेत.

गेल्या ८ वर्षांपासून भारत अजिंक्य –

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. टीम इंडियाने २०१४-१५ मध्ये ही ट्रॉफी शेवटची गमावली होती. तेव्हापासून हा संघ अजिंक्य आहे आणि त्याने तीनदा ट्रॉफी जिंकली आहे. सध्या, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली 2020-21 मध्ये ट्रॉफी जिंकणारा भारत गतविजेता आहे.

हेही वाचा – ४,४,२,६,४,६: किरॉन पोलार्डच्या वादळासमोर आंद्रे रसेलने टेकले गुडघे; एकाच षटकात २६ धावा कुटल्याने VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे टीम इंडियाने यापूर्वीच्या दोन्ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलियन भूमीवर जिंकल्या आहेत. दुसरीकडे २००४-०५ मध्ये भारताला घरच्या मैदानावर ९ पैकी फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला होता. यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही १६वी वेळ असेल. रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स हे दोघेही या ट्रॉफीमध्ये प्रथमच आपापल्या संघाचे नेतृत्व करणार आहेत.