Phoebe Litchfield Reaction On Georgia Voll’s Injury: ऑस्ट्रेलियात वुमेन्स बिग बॅश लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत सिडनी थंडर्स संघाची २२ वर्षीय फलंदाज जॉर्जिया वोलने डावाची सुरुवात करताना १५ धावांची खेळी केली. या सामन्यात फलंदाजी करताना तिने यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून आगळावेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चेंडू तिच्या हेल्मेटला जाऊन लागला. दरम्यान डगआऊटमध्ये बसलेल्या फोबी लिचफिल्डने दिलेल्या मजेशीर रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वेगवान गोलंदाजासमोर जॉर्जिया वोल रँप शॉट मारण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी तिला चेंडूच्या गतीचा अंदाज येत नाही. त्यामुळे चेंडू थेट तिच्या हेल्मेटला जाऊन लागला. चेंडू लागताच तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. हे पाहून संघातील खेळाडूंना हसू आवरलं नाही.

हा चेंडू वेगाने आला होता. त्यामुळे ती गंभीर दुखापतग्रस्त होऊ शकली असती. पण नशिबाने ती थोडक्यात बचावली. आधी डगआऊटमधील खेळाडू घाबरले. पण त्यानंतर त्यांना हसू आवरलं नाही. तिची सहखेळाडू फोबी लिचफिल्डने दिलेली रिॲक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात होबार्ट हुरिकेन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सिडनी थंडर्स संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद १८१ धावा केल्या. होबार्ट हुरिकेन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८२ धावा करायच्या आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

होबार्ट हुरिकेन्स: लिजेल ली (यष्टीरक्षक), डॅनिएल वॅट-हॉज, नेट सिवर-ब्रंट, निकोला केरी, हिथर ग्राहम, एलिसे विलानी (कर्णधार), राचेल ट्रेनामन, हेले सिल्वर-होम्स, मोली स्ट्रानो, लॉरेन स्मिथ, लिन्से स्मिथ.

सिडनी थंडर्स : जॉर्जिया वोल, ताहलिया विल्सन (यष्टीरक्षक), फोबी लिचफिल्ड (कर्णधार), हिदर नाइट, चमारी अटापटू, अनिका लेरॉयड, लोरा हॅरिस, हसरत गिल, तानेले पेशेल, शबनीम इस्माइल, सामंथा बेट्स.