नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध वेब सीरिज ‘जमतारा’बद्दल सर्वांनाच माहिती आहे, या सीरिजमध्ये फिशिंगद्वारे फसवणूक करण्यासारखेच काहीसे आयसीसीसोबत घडले आहे. आयसीसीसोबत झालेल्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे, ज्यात काही लोकांनी पेमेंटसाठी आयसीसी सल्लागाराच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केली. त्यानंतर व्हाउचरच्या स्वरूपात ही फसवणूक केली.

दुबई कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याने या विषयावर आपले प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे, परंतु क्रिकबझच्या अहवालावर विश्वास ठेवला तर आयसीसीने त्याची चौकशी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही लोकांनी युनायटेड स्टेट्समधील आयसीसी सल्लागाराच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार केली. त्यानंतर फेडरेशनच्या सीएफओकडून पेमेंटसाठी व्हाउचरची मागणी केली. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे आयसीसीमधील कोणीही वेगवेगळ्या बँकांच्या खाते क्रमांकाकडे लक्ष दिले नाही.

आयसीसीचे अधिकारी आता अमेरिकेतील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. मात्र अधिकृतपणे या प्रकरणी सर्वजण मौन बाळगून आहेत. २१ कोटींच्या या फसवणुकीनंतर आयसीसीच्या दुबई कार्यालयातील मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) आणि त्यांचा विभाग चर्चेत आला आहे.

हेही वाचा – PSG vs Riyadh XI: Messi आणि Ronaldo सोबत हस्तांदोलन करण्यासाठी पोहोचले अमिताभ बच्चन, फोटो व्हायरल

आयसीसीसोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे सांगितले जात आहे. त्याच्यांसोबत अशा तीन-चार घटना घडल्या आहेत, मात्र तरीही त्यावर कोणतीही मोठी कारवाई होताना दिसत नाही.

हेही वाचा – ‘जर तुम्हाला सडपातळ मुलं हवी आहेत, तर तुम्ही फॅशन शोमध्ये जा’; सरफराजला वगळल्याने माजी खेळाडूची संतप्त प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिकबझच्या मते, बीसीसीआयसारख्या पूर्ण सदस्यासाठी $2.5 दशलक्ष ही फार मोठी रक्कम नाही. परंतु वनडे दर्जा असलेल्या सहयोगी सदस्याला दरवर्षी आयसीसीकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या चौपट नुकसानीचे प्रमाण आहे.