Most Wickets In IPl Matches Death Overs : टी-२० क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्समध्ये ज्याप्रमाणे षटकार-चौकारांचा पाऊस पडतो. तशाचप्रकारे गोलंदाजही भेदक मारा करून फलंदाजांच्या दांड्या गुल करतात. जगातील सर्वात मोठी लीग आयपीएलमध्येही काही गोलंदाजांनी फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे. जेव्हा फलंदाज गोलंदाजांचा धुव्वा उडवतात, त्याचरदरम्यान गोलंदाजही फलंदाजाला पॅव्हेलिनचा रस्ता कसा दाखवता येईल, याची रणनिती आखत असतात. आयपीएलमध्ये अशाचप्रकारे ५ गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये अप्रतिम गोलंदाजी करून सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पियूष चावला – २६ विकेट

लेग स्पिनर पीयूष चावला डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. आयपीएलमध्ये पीयूष चावलाला दिग्गज फलंदाजांची विकेट काढण्यात यश मिळालं आहे. पीयूष चावलाच्या फिरकीनं अनेक फलंदाजांना गुंडाळलं आहे. पीयुषने आयपीएलमध्ये एकूण १५० विकेट्स घेतल्या असतून यामध्ये डेथ ओव्हर्सच्या २६ विकेट्सचा समावेश आहे.

सुनील नारायण – ४८ विकेट

वेस्टइंडिजचा धाकड खेळाडू सुनील नारायणने डेथ ओव्हर्समध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सुनीलने आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात गोलंदाजी करून ४८ विकेट घेतल्या आहेत. त्याचसोबत सुनीलने आयपीएल करिअरमध्ये एकूण १२२ विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला आहे.

नक्की वाचा – ‘त्या’ सामन्यात एकच षटकार ठोकला अन् गड्यानं इतिहास रचला, फलंदाजाचं नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

भुवनेश्वर कुमार – ६६ विकेट

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये ६६ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय अंतिम ५ षटकात सर्वात जास्त विकेट घेण्याची कामगिरी करणारा भूवनेश्वर भारताचा एकमेव गोलंदाज आहे.

ड्वेन ब्रावो – ७७ विकेट

कॅरेबियन अष्यपैलू ड्वेन ब्रावो टी-२० क्रिकेटमध्ये डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेण्यात माहिर आहे. ड्वेन ब्राओ स्लोअर वन चेंडू फेकून फलंदाजांची नेहमी कोंडी करतो. ब्रावोने आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये ७७ विकेट घेतले आहेत. तर आयपीएल करिअरमध्ये ड्वेन ब्रावोच्या नावावर १४७ विकेट आहेत.

लसित मलिंगा – ९० विकेट

आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये विकेट्समध्ये शतकाजवळ जाण्याचा कारनामा फक्त लसिथ मलिंगाने केला आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये जबरदस्त गोलंदाजी केलीय. शेवटच्या षटकात सटीक यॉर्कर फेकून मलिंगा फलंदाजांच्या दांड्या उडवण्यात यशस्वी झाला आहे. आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये मलिंगाने ९० विकेट घेतले आहेत. तर त्याच्या नावावर एकूण १७० विकेट्सची नोंद आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 5 bowlers most wickets in ipl matches death overs piyush chawla sunil narine bhuvneshwar kumar dwayne bravo lasith malinga nss
First published on: 25-03-2023 at 16:10 IST