अहमदाबाद इथे झालेल्या वर्ल्डकप २०२३च्या अंतिम मुकाबल्यात धडाकेबाज सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने शतकासह ऑस्ट्रेलियाला थरारक विजय मिळवून दिला. भारताचा डाव सुरू असताना कर्णधार रोहित शर्माचा अतिशय कठीण असा झेल हेडनेच टिपला होता. हेड ऑस्ट्रेलियासाठी किमयागार ठरला. पण एकाक्षणी हेड वर्ल्डकप खेळू शकणार नाही अशी परिस्थिती होती. 

वर्ल्डकपच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. त्या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कुत्सियाचा चेंडू खेळताना हेडच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याने मैदान सोडलं. उर्वरित सामन्यात तो खेळू शकला नाही. एक्स रे मधून निदान झालं आणि त्याचा हात मोडल्याचं स्पष्ट झालं. दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने हेड वर्ल्डकपसाठी फिट होऊ शकेल का याबाबत साशंकता निर्माण झाली.

Tristan Stubbs fielding video viral in DC vs GT Match
DC vs GT : ट्रिस्टन स्टब्सच्या सीमारेषेवरील शानदार फिल्डिंगने सामन्याला दिली कलाटणी, VIDEO व्हायरल
Pakistani youTuber viral video
VIDEO: लाइफस्टाइल ब्लॉगरचा उच्छाद थांबेना! पाकिस्तानी यूट्यूबरने बहिणीच्या मृत्यूनंतर केलेलं ‘हे’ कृत्य पाहून प्रेक्षकही भडकले
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

धडाकेबाज सलामीवीर, उपयुक्त फिरकी आणि अफलातून क्षेत्ररक्षक अशा तिन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळणारा हेड वर्ल्डकप कदाचित खेळू शकणार नाही अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने सगळ्यांना धक्का देत हेडची वर्ल्डकपसाठी निवड केली. वर्ल्डकपच्या पूर्वार्धात हेड उपलब्ध नसेल हे माहिती असतानाही निवडसमितीने हेडला संघात स्थान दिलं. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात हेडविनाच दाखल झाला. तांत्रिकदृष्ट्या ऑस्ट्रेलियाचा संघ सुरुवातीचे ५ सामने १४ खेळाडूंनिशीच खेळत होता. कारण हेडची रिहॅब प्रक्रिया ऑस्ट्रेलियात सुरू होती. 

ऑस्ट्रेलियाने सुरुवातीच्या दोन लढती गमावल्याने हेडऐवजी दुसऱ्या खेळाडूची निवड करा असा दबाब  निवडसमितीवर होता. चौथ्या सामन्यापूर्वी हेड भारतात दाखल झाला पण तो मॅचफिट नसल्याने तो सामना खेळू शकला नाही. धरमशाला इथे न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत हेडने पुनरागमन केलं. प्रतिस्पर्धी संघ हेडच्या हाताची दुखापत लक्षात घेऊन आक्रमण करतील अशी चिन्हं होती. पण हेडने पारंपरिक प्रतिस्पर्धी न्यूझीलंडविरुद्ध अवघ्या ५९ चेंडूत शतक झळकावत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. हेडने त्या सामन्यात १०९ धावांची झंझावाती खेळी साकारली.

इंग्लंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध हेडला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत हेडने गोलंदाजी करताना धोकादायक ठरु शकणाऱ्या हेनरिच क्लासनला त्रिफळाचीत केलं. त्याच षटकात मार्को यान्सनला पायचीत केलं. या दोन विकेट्सनी सामन्याचं चित्र पालटलं. फलंदाजी करताना हेडने ६२ धावांची संयमी खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. 

अंतिम मुकाबल्यात भारतीय संघाने आक्रमक पवित्रा स्वीकारला. कर्णधार रोहित शर्मा चौकार-षटकारांची लयलूट करत होता. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने समोरच्या दिशेने फटका मारला पण चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने गेला. ३० गज वर्तुळात असलेल्या हेडने धावत मागे जाऊन तोल ढळू न देता अफलातून झेल टिपला. रोहित तंबूत परतताच भारताची धावगती मंदावली. निर्धारित ५० षटकात भारताला २४० धावाच करता आल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ४७/३ अशी झाली होती. मात्र हेडने शांतचित्ताने भारतीय गोलंदाजांचा सामना केला. चौथ्या विकेटसाठी त्याने मार्नस लबूशेनसह .. धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

योगायोग म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीतही हेडने १६३ धावांची शतकी खेळी साकारली होती. ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकला होता आणि हेडला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. २०१६-२०१७ या वर्षी हेड आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला होता. त्याला मर्यादित संधी मिळाल्या. २०१७ नंतर आरसीबी संघाने त्याला रिलीज केलं.