Deepak Chahar Out Of T20 World Cup: आयसीसीच्या आगामी टी 20 विश्वचषकासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना काल टीम इंडियाचा गोलंदाज दीपक चहर सुद्धा संघातून बाहेर पडला. टी 20 विश्वचषकातील चार राखीव खेळाडूंमध्ये दीपक चहरचा समावेश होता. एकीकडे बुमराह व जडेजा नसताना, शमीची अजून फिटनेस टेस्ट बाकी असताना गोलंदाजांची फळी बरीच कमकुवत होती. अशात चहर जर गोलंदाजीत चमकला असता तर टीम इंडियाला मोठी मदत झाली असती पण त्याआधीच चहरला मायदेशी परतावे लागले आहे.

दुखापतीनंतर दीपक चहरने ओडीआय मधून टीम इंडियात पुनरागमन केले होते. झिम्बाम्बवे विरुद्ध सामन्यातील कामगिरी पाहता विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्ये दीपक चहरचे नाव निश्चित झाले होते. पण विश्वचषक सुरू होण्याच्या अवघ्या चार दिवसांआधीच पाठीच्या दुखण्यामुळे चहर संघातून बाहेर पडला. या एकूणच परिस्थितीला पाहता टीम इंडियाचे चाहते दुःखी आहेत मात्र अशातच चहरच्या बहिणीची एक पोस्ट सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा व्हायरल होत आहे.

दीपक चहरने एका सामन्याच्या नंतर गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिला सर्वांसमोरच प्रपोज केले होते. यंदा जूनमध्ये दीपक व जया यांनी आग्रा येथे लग्न केले. यावेळी नवदांपत्याला शुभेच्छा देताना चहरची बहीण, मालतीने हनीमूनच्या वेळी पाठीची काळजी घेण्याबाबत इशारा दिला होता. “हनीमूनमध्ये पाठीची काळजी घ्या.. आपल्याला वर्ल्ड कप खेळायचा आहे’, असे तिने लिहिले होते. आता दीपक खरोखरच पाठीच्या दुखण्याने संघातून बाहेर पडल्यावर नेटकऱ्यांनी चहरच्या बहिणीचा सल्ला व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

पाहा इंस्टाग्राम पोस्ट

१५० च्या वेगाने गोलंदाजी पण विश्वचषकात.. ‘या’ भारतीय गोलंदाजाची ऑस्ट्रेलियाकडून पाठराखण, भारताला सुनावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आयसीसी टी 20 विश्वचषक पार पडणार आहे. टी 20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा पहिला सामना खेळला जाणार आहे, आशिया चषकातील पराभवाचा बदला घेण्याची ही संधी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरणार आहे.