Ind vs WI : शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला वन-डे संघात स्थान

शार्दुल दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त

Umesh Yadav,
उमेश यादव (संग्रहीत छायाचित्र)

विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरला आपलं वन-डे संघातलं स्थानही गमवावं लागलं आहे. हैदराबाद कसोटीत केवळ 10 चेंडू टाकल्यानंतर शार्दुलला दुखापत झाली होती, त्यामुळे पुढे तो गोलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे बीसीसीआयने खबदारीचा उपाय म्हणून उमेश यादवची पहिल्या दोन वन-डे सामन्यांसाठी संघात निवड केली आहे. उमेश यादवने हैदराबाद कसोटी सामन्यात 10 बळी घेतले होते. याआधीही आशिया चषकात शार्दुल ठाकूरला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Umesh yadav to replace shardul thakur for first two west indies odis