Umpires interfering with Dravid-Pandya preventing Yuzvendra Chahal from going to batting: वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. एकेकाळी टीम इंडिया विजयाच्या जवळ दिसत होती, पण डावाच्या १६व्या षटकात हार्दिक पांड्या (१९) आणि संजू सॅमसन (१२) यांच्या विकेट्स घेताच वेस्ट इंडिजने पुनरागमन केले. अखेरचा स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून आलेला अक्षर पटेल (१३) १९व्या षटकातही तंबूत परतला. त्यानंतर भारतीय संघाचा पराभव होणार हे निश्चित झाले. या सामन्यातील आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोच आणि कर्णधाराने युजवेंद्र चहल फलंदाजी गेला असता, त्याला परत बोलावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने लागोपाठ दोन चौकार मारून भारताला विजयाची आशा निर्माण केली, पण त्यानंतर त्याला भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. दरम्यान, या सामन्यात एक रोमांचकारी किस्साही पाहायला मिळाला. खरेतर, कुलदीप यादव (३) डावाच्या २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला. टीम इंडियाला हा आठवा धक्का होता.

चहल फलंदाजीला जाण्यापासून द्रविड-पांड्याने थांबले –

लेगस्पिनर युजवेंद्र चहल येथून १०व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारला चहलच्या आधी संधी दिली जाऊ शकते, असे कर्णधार हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना वाटत होते. पण हे सर्व अचानक घडले, त्यामुळे चहलला माहित नव्हते की संघाच्या थिंक टँकला त्याच्याऐवजी मुकेशला फलंदाजीसाठी पाठवायचे आहे. आणि कुलदीप आऊट होताच तो क्रीजच्या दिशेने निघाला.

चहल डगआउटमध्ये परतत असताना अंपायरने केला हस्तक्षेप –

टीम इंडिया डगआऊटमध्ये बसली होती, जी सीमारेषेच्या जवळ होती आणि कुलदीप बाद झाल्यानंतर मैदानावरील वेस्ट इंडिजचे चाहते खूप आवाज करत होते, त्यामुळे सीमारेषा ओलांडताना चहलला द्रविड आणि पांड्याचा आवाज ऐकू आला नाही. हार्दिक आणि द्रविडचा आवाज ऐकू न आल्याने तो आधीच मैदानात उतरला होता. त्यानंतर आवाज ऐकू आल्यावर परत येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अंपायरने हस्तक्षेप करत त्याला रोखले.

हेही वाचा – IPL 2024: RCB संघात मोठा बदल! लखनऊ सुपर जायंट्सच्या प्रशिक्षकाची आरसीबीमध्ये एन्ट्री

अंपायरने क्रिकेटच्या नियमाची करून दिली आठवण –

दरम्यान, मुकेश कुमारही चहलपाठोपाठ मैदानावर पोहोचला. आता येथे पंचाला हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी द्रविड आणि पांड्याला क्रिकेटच्या नियमाची आठवण करून दिली की, जेव्हा एखादा नवीन फलंदाज विकेट पडल्यानंतर मैदानात उतरतो, तेव्हा तो परत जाऊ शकत नाही. अशा स्थितीत मुकेश कुमारला पुन्हा डगआऊटमध्ये पाठवण्यात आले आणि चहल पुन्हा फलंदाजीला आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umpires interfering with dravid pandya preventing yuzvendra chahal from going to batting video goes viral vbm
First published on: 04-08-2023 at 13:16 IST