Under-19 Asia Cup – India Vs Pakistan : अंडर-१९ आशिया कपच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा २ विकेटने पराभव करत विजय मिळवला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत पाकिस्तानसमोर २३८ धावांचं लक्ष्य ठेवलं. याच्या प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने ८ विकेट गमावत लक्ष्य प्राप्त केलं. विशेष म्हणजे हा चुरशीचा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत चालला. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी २ धावा हव्या असताना चौकार मारत पाकने सामना खिशात घातला.

भारताने पाकिस्तानसमोर २३८ धावाचं लक्ष्य ठेवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी करत पाकिस्तानला बॅकफुटवर ठेवलं. शेवटच्या ३ षटकांमध्ये तर काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र, ४९ व्या षटकात भारताने पाकिस्तानला १० धावा दिल्या. इथेच पाकिस्तानचं लक्ष्यामधील अंतर कमी झालं आणि पुन्हा शेवटच्या म्हणजे ५० व्या षटकात देखील १० धावा मिळवत पाकिस्तानने विजय मिळवला.

विशेष म्हणजे शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला २ धावांची गरज असताना पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला, मात्र चौकार मारत पाकने या दबावाचं रुपांतर विजयात केलं.

पाकिस्तानकडून कुणाची किती धावसंख्या?

मोहम्मद शाहजाद – ८१ धावा
मोहम्मद इरफान खान – ३२ धावा
अहमद खान* – २९ धावा

भारताकडून कुणाची किती धावसंख्या

आराध्य यादव* – ५० धावा
हरनूर पन्नू – ४५ धावा
राजवर्धन हंगार्गेकर – ३३ धावा

भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली, मात्र सुरुवातीलाच अनेक झटके बसले. मात्र, मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगली बाजू सांभाळली. भारताकडून यष्टीरक्षक आराध्य यादवने अर्धशतक केलं. हरनूर सिंहने देखील ४६ धावांची चांगली खेळी केली. यासह भारताने २३७ धावसंख्या केली. पाकिस्तानकडून जीशान जमीनने ५ विकेट घेतल्या.

भारतीय संघ : ए. रघुवंशी, हरनूर सिंह, एस. रशीद, यश ढुल (कर्णधार), निशांत सिंधु, राज बावा, कौशल तांबे, आराध्य यादव, विकी ओस्तवाल, रवि कुमार, राजवर्धन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचा संघ : ए. बांग्लाजई, माज़ सदाकत, मोहम्मद शहजाद, एच. खान, कासिम अकरम (कर्णधार), इरफान खान, रिजवान महमूद, अहमद खान, अली असफंद, जीशान जमीर, ऐवास अली