आपल्यातील भन्नाट वेगाने सर्वानाच मंत्रमुग्ध करणाऱ्या जमैकाच्या युसेन बोल्टचा जलवा अर्जेटिनावासीयांना डिसेंबर महिन्यात अनुभवता येणार आहे. ब्युनोस आयर्स येथील ९ डे ज्युलिओ अव्हेन्यू येथे ७ किंवा १३ डिसेंबरला होणाऱ्या एका प्रदर्शनीय शर्यतीत बोल्ट सहभागी होणार आहे. २००८ आणि २०१२ ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्णपदके पटकावणारा बोल्ट या शर्यतीत धावण्यासाठी उत्सुक आहे. तो त्याच्या अन्य तीन साथीदारांसह या शर्यतीत धावणार आहे, असे या शर्यतीचे संयोजक गुलेर्मो मरिन यांनी सांगितले. अनेक ग्रँड स्लॅम जेतेपदांना गवसणी घालणाऱ्या सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स भगिनी येथे एक प्रदर्शनीय टेनिस सामनाही खेळणार असल्याचे समजते, मात्र त्याविषयी अधिकृत माहिती मरिन यांच्याकडून मिळू शकली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
ब्युनोस आयर्समध्ये डिसेंबरमध्ये युसेन बोल्टचा जलवा
आपल्यातील भन्नाट वेगाने सर्वानाच मंत्रमुग्ध करणाऱ्या जमैकाच्या युसेन बोल्टचा जलवा अर्जेटिनावासीयांना डिसेंबर महिन्यात अनुभवता येणार आहे

First published on: 03-10-2013 at 04:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usain bolt to race 100 metres on major buenos aires avenue