scorecardresearch

‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर

इंडियन प्रीमियर लीग  (आयपीएल) या जगातील सर्वात मोठय़ा आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून यावेळी पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर केला जाणार आहे.

प्रातिनिधिक संग्रहित छायाचित्र

वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग  (आयपीएल) या जगातील सर्वात मोठय़ा आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार असून यावेळी पहिल्यांदाच सांख्यिकी यंत्रमानवाचा वापर केला जाणार आहे.

‘आयपीएल’चे प्रसारण करणारी वाहिनी स्टार स्पोर्टसचा तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिकाधिक भर असून सामन्यांदरम्यान समालोचकांना संघांविषयी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी यंदा ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानवाचा (रोबो स्टॅटिस्टीक्स) वापर केला जाईल. याबाबतची माहिती डिस्ने स्टारच्या क्रीडा विभागाचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी दिली. ‘‘आम्ही ‘क्रिको’ नामक सांख्यिकी यंत्रमानव तयार केला आहे. तो समालोचकांचे साहाय्य करेल. आमच्या समालोचकांना विराट कोहली ‘आयपीएल’मध्ये एखाद्या प्रकारच्या चेंडूवर किती वेळा बाद झाला आहे, याची माहिती पाहिजे असल्यास ते ‘क्रिको’ला याबाबत विचारू शकतील. तो ३० सेकंदात त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईल,’’ असे गुप्ता यांनी सांगितले.

तसेच यंदा पहिल्यांदाच सर्व ७४ सामन्यांचे मराठी भाषेत समालोचन केले जाईल. संदीप पाटील, अमोल मुझुमदार, स्नेहल प्रधान आणि विनोद कांबळी यांसह अन्य काही जण समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. यंदाच्या ‘आयपीएल’चे साखळी सामने महाराष्ट्रात होणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Use of statistical robots for the first time in the ipl largest most popular competition ysh

ताज्या बातम्या