ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटीतील सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजाने क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डवर त्यांच्या निवडींमध्ये पक्षपातीपण केल्याचा आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आरोप असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर याची चर्चा होताना दिसत आहे. दक्षिण आशियाई वंशाचा एकमेव डावखुरा हा खेळाडू आहे जो कसोटीत देशाचे प्रतिनिधित्व करतो. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तसंस्थेशी बोलताना ख्वाजा यांने सांगितले की, तो १४-१५ वर्षांचा होईपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाला त्याने का पाठिंबा दिला नाही. गेल्या १० वर्षांत देशातील वर्णभेद आणि वंशभेद यात थोडासाही बदल झालेला नाही.

३६ वर्षीय ख्वाजा पुढे बोलताना म्हणाला” एवढे होऊनही मी कधीच देश सोडला नाही तर उलट क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत काम करण्याचा प्रयत्न करत होतो आणि अजूनही त्याच्यासोबतच काम करत राहीन. बघा मित्रांनो… तुम्ही तुमचे आयुष्य गुंतवलेले असते, पण आपल्यासोबत काहीतरी बरोबर होत नाही आहे असे जेव्हा लक्षात येते तेव्हा तुम्ही निराश होतात.”

मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारला, “तुम्ही १० वर्षांपासून हे सहन करत आहात आणि काहीही बदलले नाही असे तुम्ही म्हणत आहात मग समस्येचे मूळ कोठे असू शकते?”, असे विचारले असता ख्वाजा याने उत्तर दिले की, “कृष्णवर्णीय. आशिया आणि आफ्रिकन लोकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा गौरवर्णीय आणि पश्चिमी देशांचा वेगळा आहे, यात ऑस्ट्रेलिया देखील मागे नाही. जर तुमच्याकडे दोन क्रिकेटपटू असतील, एक कृष्णवर्णीय आणि एक गौरवर्णीय, दोन्ही सारखेच, त्यांची कामगिरी देखील सारखीच मात्र तरी देखील तो प्रशिक्षक गौरवर्णीय क्रिकेटर निवडणार आहे. कारण त्याला त्याच्यासारखा दिसणारा मुलगा आहे. हेच त्याला अपेक्षित आहे.”

हेही वाचा: IND v SL 2023: ईडन गार्डनवर विराट-इशान झाले ‘झिंगाट’! जबरदस्त डान्सच्या स्टेप्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क, Video व्हायरल

उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानात झाला असून त्याची सर्व जडणघडण ही तिथेच झाली असेल तरी तो तरुण वयात सिडनीला गेला होता. ख्वाजाने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाकडून ५६ कसोटी, ४० एकदिवसीय आणि ९ टी२० सामने खेळले आहेत. २०११ मध्ये सिडनी येथे अॅशेस कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त रिकी पाँटिंगच्या जागी त्याची संघात निवड करण्यात आली होती. तिसर्‍या क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी त्याने पदार्पण केले होते.

एक प्रस्थापित ऑस्ट्रेलियन आंतरराष्ट्रीय खेळाडू असूनही असा आरोप त्याच्याकडून संघावर होणे ही खूप मोठी घटना आहे. ख्वाजाचा दावा आहे की मालिका सुरु असताना अचानक त्याची ओळखपत्रे तपासण्यासाठी सुरक्षारक्षकांनी सुरक्षेसाठी त्याला थांबवले गेले होते. गेल्या वर्षी नाताळच्या दिवशी ही घटना त्याच्यासोबत घडली होती, ख्वाजाने अनुभवलेल्या घटनेची माहिती ट्विटरवर कथित केली. “गेल्या वर्षी मी ऑस्ट्रेलियन संघासोबत असताना आमच्या हॉटेलमध्ये ३ वेळा थांबलो आणि विचारले की मी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासोबत आहे का…”

द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, १३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार्‍या अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सीरीज द टेस्टच्या दुसऱ्या सीझनच्या एका एपिसोडमध्ये ख्वाजा ब्रिस्बेनमधील एका मुस्लिम शाळेला भेट देताना आणि वर्णद्वेषाचे अनुभव शेअर करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करण्यास मदत करताना तो सांगत आहे.

हेही वाचा: IND vs SL: “मला हे माहित नव्हते धन्यवाद…” युजवेंद्र चहलच्या ‘गुगलीवर’ कुलदीप झाला ‘क्लीन बोल्ड’ Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा चेंडू छेडछाड प्रकरणापासून अॅशेसच्या यशस्वी बचावापर्यंतचा प्रवास डॉक्युमेंट-मालिकामध्ये बदलला गेला, ज्यामध्ये न पाहिलेले ड्रेसिंग रूम फुटेज समाविष्ट होते. ‘द टेस्ट: ए न्यू एरा फॉर ऑस्ट्रेलिया संघ’ या आठ भागांच्या मालिकेतील सीझन १, ऑस्ट्रेलियाचा घरच्या भूमीवर भारताकडून झालेला पहिला कसोटी मालिका, विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर पडणे आणि त्यानंतर राख संरक्षण असे प्रसंग समाविष्ट आहेत.