scorecardresearch

२०२६च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद व्हिक्टोरियाला

या स्पर्धेसाठी १६ क्रीडा प्रकारांची प्रारंभिक यादी पुढे करण्यात आली असून यात ट्वेन्टी-२० क्रिकेटचाही समावेश आहे.

लंडन : ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्याला २०२६ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे. मात्र, ही स्पर्धा पारंपरिक पद्धतीने केवळ एका ठिकाणी नाही, तर व्हिक्टोरिया राज्यातील विविध शहरांमध्ये होणार आहे.

२०२६ची राष्ट्रकुल स्पर्धा मेलबर्न, जिलॉन्ग, बेिडगो, बेलार्ट आणि जिप्सलँड आदी शहरांमध्ये खेळवण्यात येणार असून सर्व शहरांमध्ये खेळाडूंसाठी क्रीडा ग्राम असेल. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा एक लाख आसनसंख्या असलेल्या ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) पार पडेल, अशी राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) मंगळवारी घोषणा केली. ‘सीजीएफ’, ऑस्ट्रेलियन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समिती आणि व्हिक्टोरिया राज्यामध्ये विस्तृत चर्चा झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. या स्पर्धेसाठी १६ क्रीडा प्रकारांची प्रारंभिक यादी पुढे करण्यात आली असून यात ट्वेन्टी-२० क्रिकेटचाही समावेश आहे. वर्षअखेपर्यंत या यादीत अन्य काही खेळांचा समावेशही करण्यात येईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Victoria to host 2026 commonwealth games zws

ताज्या बातम्या