scorecardresearch

Premium

PAK vs NED: बेस डे लीडने षटकार मारल्यानंतर हारिस रौफला डिवचण्यासाठी केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल

Base Day Lead Video Viral: बेस डे लीड हा त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. यासोबतच तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही होता. फलंदाजी करताना हरिस रौफच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार लगावला होता, ज्याचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे.

PAK vs NED Match Updates
बेस डे लीडने षटकार मारल्यानंतर हारिस रौफला डोळा मारला (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Base Day Lead hitting the eye video viral: शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँड्सच्या बेस डे लीडने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्याने प्रथम गोलंदाजी करताना ६२ धावांत चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना डी लीडने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने ६८ चेंडूंचा सामना करत ६७ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. यातील एका षटकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उजव्या हाताच्या फलंदाजाने अनेक उत्कृष्ट फटके खेळले. त्याने हारिस रौफच्या षटकातही एक सुरेख षटकार मारला. हे नेदरलँड्सच्या डावातील हे २९ वे षटक होते. यानंतर त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला डिवचण्याचा प्रयत्न केला. बेस डे लीडने शानदार षटकार मारल्यानंतर हारिस रौफला डोळा मारला. या घटनेचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
All people think Rohit Sharma's bitter sweet DRS affair continues commentators left in splits
VIDEO : ‘काही सेकंद बाकी, सर्वांनी डोकं लावा…’, डीआरएसबाबत रोहित शर्मा गोंधळला, शेवटच्या क्षणी घेतला निर्णय
it was my dream to play for india in front of my father says sarfaraz khan
वडिलांसमोर भारतासाठी खेळण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद! भारताचा फलंदाज सर्फराज खानची प्रतिक्रिया
Shubman Gill's reaction to century against ENG 2nd Test
IND vs ENG : “माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या, तेव्हा…”, इंग्लंडविरुद्धच्या शतकी खेळीनंतर शुबमन गिलची प्रतिक्रिया

बेस डे लीडने आपल्य फलंदाजीने एका अनोख्या यादीत आपले नाव नोंदवले. विश्वचषक पदार्पणात चार विकेट्स घेऊन अर्धशतक करणारा तो जगातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा पराक्रम झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचर (१९८३) आणि नील जॉन्सन (१९९९) यांनीही केला होता.

हेही वाचा – Asian Games: भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, टीम इंडियाने पूर्ण केले पदकांचे शतक

डी लीडने विक्रमजीत सिंगसह ७६ चेंडूत ७० धावांची भागीदारी केली. विक्रमजीत सिंगनेही ६७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या भागीदारीमुळे नेदरलँडला १०० धावांचा टप्पा पार करता आला. याआधी त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली होती. त्याने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान आणि हसन अली यांच्या विकेट घेतल्या. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४९ षटकांत २८६ धावा करून बाद झाला. ज्यामध्ये लीडने ६२ धावांत चार गडी बाद बाद केले.

हेही वाचा – शतकवीर भारत! आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची शंभरी पार करत घडवला इतिहास!

सामन्याबद्दल बोलायचे, तर हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि नेदरलँडसचे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव केला. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४९ षटकांत २८६ धावांत गारद झाला. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ४१ षटकांत २०५ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून अर्धशतक झळकावणाऱ्या सौद शकीलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of haris rauf eyeballing the base day lead after hitting a six went viral in pak vs ned match vbm

First published on: 07-10-2023 at 13:03 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×