scorecardresearch

Premium

World Cup 2023: गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर, जो रूटने रिव्हर्स स्वीप मारत ठोकला शानदार षटकार, पाहा VIDEO

ENG vs NZ Match Updates, Cricket World Cup 2023: जो रूटची बॅट बराच वेळ शांत होती, पण न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक २०२३ च्या सलामीच्या सामन्यात त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांविरुद्ध दमदार फटकेबाजी केली. त्याच्या एका षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
जो रूटच्या षटकाराचा व्हिडीओ व्हायरल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ICC Cricket World Cup 2023, England vs New Zealand: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला गुरुवारी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने अहमदाबाद येथे झाली. या सामन्यात इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटने त्याच्या एका शॉटने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्याने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारत शानदार षटकार ठोकला. जो रूटच्या या शॉटचे क्रिकेट चाहते कौतुक करत आहेत. तसेच या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लंडच्या डावातील १२व्या षटकातील तिसरा चेंडू, जो आऊटऑफवर आला, जो रुट हा पूर्ण चेंडू खेळण्याच्या स्थितीत आला आणि त्याने रिव्हर्स स्वीप शॉट मारला. तो चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी गेला. जो रूटच्या या शॉटने गोलंदाजासह क्रिकेट चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर जो रूटच्या या षटकाराला क्रिकेट चाहत्यांनी ‘शॉट ऑफ द डे’ असे म्हटले.

Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग
Sajeevan Sajna hit a winning six off the last ball against Delhi Capitals
WPL 2024 : कोण आहे सजीवन सजना? जिच्या एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष
Ajinkya Rahane given out obstructing the field before rivals withdraw appeal
Ranji Trophy : बाद होऊनही अजिंक्य रहाणेची पुन्हा फलंदाजी, आसामविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं?
Shubman Gill's reaction to century against ENG 2nd Test
IND vs ENG : “माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या, तेव्हा…”, इंग्लंडविरुद्धच्या शतकी खेळीनंतर शुबमन गिलची प्रतिक्रिया

जो रुटने ८६ चेंडू खेळताना ७७ धावा केल्या. रूटच्या ७७ धावांच्या खेळीत ४ चौकार आणि एक षटकारही समाविष्ट होता. तसेच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला. या खेळीनंतर ग्लेन फिलिप्सने जो रूटला क्लीन बोल्ड केले. रूटला ग्लेन फिलिप्सचा चेंडू अजिबात समजला नाही आणि तो बाद झाला.

हेही वाचा – World Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘या’ दिग्गज खेळाडूचे खेळणे कठीण

इंग्लंडचे न्यूझीलंडसमोर २८३ धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून २८२ धावा केल्या. त्यांवी न्यूझीलंडला २८३ धावांचे लक्ष्य दिले. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. कर्णधार जोस बटलरने ४३ धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने ३३, हॅरी ब्रूकने २५ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने २० धावांचे योगदान दिले. आदिल रशीदने नाबाद १५, डेव्हिड मलान आणि सॅम कुरनने १३-१४, मार्क वुडने नाबाद १३, मोईन अली आणि ख्रिस वोक्सने ११-११ धावा केल्या.

हेही वाचा – World Cup 2023: जर पॉइंट आणि नेट रनरेटही समान असल्यास कोणता संघ क्वालिफाय ठरतो? जाणून घ्या वर्ल्डकपचे नियम

या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजांना मुक्तपणे खेळू दिले नाही. वेगवान आणि फिरकीच्या मिश्रणाने इंग्लिश संघाला खूप त्रास दिला. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. फिरकीपटू मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. ट्रेंट बोल्ट आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of joe roots reverse sweep six off the bowling of trent boult went viral in eng vs nz match vbm

First published on: 05-10-2023 at 18:16 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×