India vs Australia 2023 1st ODI Match Updates: शुक्रवारी वानखेडेवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुल फॉर्ममध्ये परतला. केएलने प्रथम विकेटकीपिंगमध्ये चमकदार कामगिरी केली, त्यानंतर त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळून दिला. ज्यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ५ गडी शानदार विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात मिचेल स्टार्कचा एक वेगवान चेंडू केएल राहुलला जोरात लागला होता. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पोटावर लागला वेगवान चेंडू –

ही घटना २८व्या षटकात पाहायला मिळाली. स्टार्कने केएलला पहिलाच चेंडू इतका वेगवान टाकला की, तो सरळ केएल राहुलच्या पोटावर जाऊन लागला. हा चेंडू इतका वेगवान होता की, केएल त्याच्या वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळे केएल राहुल काही काळ जमिनीवर बसून राहिला. त्यानंतर थोड्या वेळाने तो पुन्हा फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला.

जडेजा आणि राहुलमध्ये नाबाद १०८ धावांची भागीदारी –

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ ३५.४ षटकांत १८८धावांवर गारद झाला. कांगारूंकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ८१धावांची खेळी केली. १८९ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताने ३९.५ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात केएल राहुलला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. त्याने या सामन्यात शानदार खेळी केली. त्याने ९१ चेंडूत ७५ धावांची नाबाद खेळी केली. या दरम्यान राहुलनने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचबरोबर रवींद्र जडेजाही ४५ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी १०८ धावांची नाबाद भागीदारी झाली.

हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: मिचेल स्टार्कने विराटला बाद करत केला मोठा कारनामा; ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा चौथा गोलंदाज ठरला

या मैदानावर दोघांमध्ये पाच एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने तीन आणि ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने या मैदानावर २००७ मध्ये एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव केला होता. त्यानंतर २०२० मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. आता तब्बल १६वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला हरवण्यात यश मिळविले आहे.