scorecardresearch

Premium

IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्याच दिवशी रोहित शर्मा संतापला; लाइव्ह सामन्यात केली शिवीगाळ, VIDEO व्हायरल

WTC 2023 Final Updates: डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्याच दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूप संतापलेला दिसला. लाइव्ह सामन्यादरम्यान त्याने संघातील खेळाडूंना शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rohit Sharma Video Viral
रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rohit Sharma abusing his teammate on the first day of the WTC final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डब्ल्यूटीसीचा फायनल सामना ७ जून पासून लंडनमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करताना ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ३ गड्यांच्या मोबदल्यात ३२७ धावा केल्या आहेत. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघातील खेळाडूंवर चांगलाच संतापलेला दिसला. त्याने सामन्यादरम्यान खेळाडूंना शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवींद्र जडेजाने चेंडू घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. यादरम्यान रोहित शर्मा जडेजाजवळ येताना तो खेळाडूंना शिवीगाळ करतो, त्याचा हा आवाज स्पष्टपणे व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. यानंतर जडेजा आणि रोहित शर्मा एकमेकांशी बोलतात. त्यानंतर रोहित शर्मा चेतेश्वर पुजाराचे नाव घेऊन काहीतरी बोलतो.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

चौथी विकेट घेताना भारतीय गोलंदाजांना फुटला घाम –

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघाला सुमारे एक तास भारतीय गोलंदाजांनी बांधून ठेवले होते, पण हळूहळू ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सूर गवसला. त्यानंतर शानदार फलंदाजी करताना संघाचा डाव सावरला. भारतीय संघाने २५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्नस लबुशेनच्या रूपाने ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट घेतली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना चौथ्या विकेटसाठी संघर्ष करावा लागत आहे.

हेही वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: ट्रॅव्हिस हेडने रचला इतिहास, ४८ वर्षांनी घडला ‘हा’ अजब योगायोग

यानंतर पहिल्या दिवशी एकूण ८५ षटके टाकली, पण भारतीय गोलंदाजांना चौथी विकेट घेता आली नाही. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. जिथे हेडने वेगवान खेळी खेळली आणि १५६ चेंडूत २२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४६* धावा केल्या. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने त्याला साथ देताना २२७ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने ९५* धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी २५१* धावांची भागीदारी केली

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video of rohit sharma abusing his teammate on the first day of the wtc final went viral vbm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×