Salem Sujay’s run out Video viral in TNPL 2023: सध्या तामिळनाडूत टीएनपीएल २०२३ ही स्पर्धा खेळली जात आहे. ज्यामध्ये देशांतर्गत क्रिकेटपटू आपले कौशल्य दाखवताना दित आहेत. या लीगमध्ये, २७ जून रोजी, हंगामातील १९ वा सामना सालेम स्पार्टन्स आणि लायका कोवई किंग्ज यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये मैदानावरील पंचाची मोठी चूक उघडकीस आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही चूक समोर आली.

वास्तविक, तामिळनाडूत प्रीमियर लीगच्या १९ व्या सामन्यात लायका कोवई किंग्ज आणि सालेम स्पार्टन्सचे संघ आमनेसामने होते. या सामन्याच्या एक क्षण खूप चर्चेत आहेत. या सामन्यात लायका कोवई किंग्जचा सलामीवीर सालेम सुजॉय धावबाद होऊनही बचावला. पंचांच्या चुकीमुळे संधी मिळाल्यानंतर या खेळाडूने ४४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

वास्तविक, सामन्यादरम्यान जेव्हा लायका कोवई किंग्सची फलंदाजी सुरु होती, तेव्हा तिसरे षटक टाकण्यासाठी अभिषेक तन्वर आला होता. त्याच्या समोर क्रिझवर सालेम सुजय होता, त्याने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर कव्हर्सच्या दिशेने एक शॉट मारला, जो पकडण्यासाठी क्षेत्ररक्षक धावले आणि त्याला धावबाद करण्यासाठी नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला चेंडू फेकला.

असाच बचावला फलंदाज –

दुसर्‍या टोकाला पोहोचलेला फलंदाज सुजयला चेंडूचा लागणार होता, पण त्याने क्रीझजवळ जाताच ​​उडी मारली. दुसऱ्या बाजूने चेंडू स्टंपच्या खाली गेला. चेंडू स्टंपला लागल्यावर फलंदाजाची बॅट आणि त्याचे पाय हवेत होते. अशा स्थितीत नियमानुसार फलंदाजाला बाद घोषित करायला हवे होते, पण ही चूक दोन्ही संघांना दिसली नाही. ज्याचा फायदा फलंदाजाला झाला. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Natasha Stankovic: हार्दिक पांड्यासोबत पत्नी नताशा झाली रोमँटिक, कॅमेऱ्यासमोर अशी पोज दिली की चाहते म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लायका कोवाई किंग्जचा ७९ धावांनी विजयी –

सामन्याबद्दल सांगायचे तर, सालेम स्पार्टन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लायका कोवाई किंग्ज संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १९९ धावा केल्या. संघाकडून सुजयने ४४, साई सुदर्शनने ४१ आणि राम अरविंदने अर्धशतकी खेळी केली. २०० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना सालेम स्पार्टन्स संघ अवघ्या १९ षटकांत १२० धावांत गारद झाला. अशाप्रकारे किंग्जने हा सामना ७९ धावांनी जिंकला.