आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्यपदक स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे सरिता देवीवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (एआयबीए) दिल्यानंतर आता भारतीय बॉक्सिंगचा चेहरा असलेल्या विजेंदर सिंगने सरिताची पाठराखण केली आहे. एआयबीएने सरितावर बंदी आणण्याऐवजी पदाधिकाऱ्यांच्या कृत्याचा आढावा घ्यायला हवा, असे मत विजेंदरने व्यक्त केले आहे.
बॉक्सिंग इंडियाला कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय मान्यता
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनची (एआयबीए) मान्यता मिळवण्याचे सर्व निकष पूर्ण करण्यात आल्यानंतर एआयबीएच्या कोरिया येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॉक्सिंग इंडियाला कायमस्वरूपी मान्यता देण्यात आली. दरम्यान,  डॉ. चिंग-कुओ वू यांची तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली.