Virat Fan Marriage: वचनपूर्ती निमित्त स्पेशल ‘विराट’ भेट! कोहलीचे ७१वे आंतरराष्ट्रीय शतक अन फॅन्सच्या गळ्यात लग्नाची माळ

Virat Fan Marriage: विराट कोहलीची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. अशाच एका चाहत्याने विराट कोहलीचे ७१वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, असे वचन दिले होते आणि लग्नानंतर त्याला किंग कोहलीची मोठी भेट मिळाली.

I will marry only after Virat's 71st century Kohli gave a 'gift' to the fan on the wedding day
सौजन्य- (ट्विटर)

Virat Fan Marriage: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीची फॅन फॉलोइंग जगभरात पसरलेली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यातही असेच दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा एका चाहत्याने सुरक्षा घेरा तोडून विराटला भेटले. सामन्याच्या एका दिवसानंतर, आणखी एका चाहत्याने असा एक फोटो शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

खेळाडू आणि सेलिब्रिटींचे सर्व प्रकारचे चाहते आहेत. बरेच सामान्य चाहते आहेत आणि काही डाय हार्ड चाहते आहेत. विराट कोहलीचेही बरेच चाहते आहेत काहींनी सोशल मीडियावर क्रेझ दाखवली, तर काही सामना सुरू असतानाच स्टेडियममध्ये प्रवेश करतात. असाच एक चाहता म्हणजे अमन अग्रवाल. अमनचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अमनने लग्नाची शेरवानी घातली आहे आणि टीव्हीच्या मागे विराट श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करत आहे.

आता तुम्ही विचार करत असाल की या फोटोत विशेष काय आहे? अमन अग्रवाल नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. एक चित्र १० एप्रिल २०२२चे आहे आणि दुसरे चित्र १५ जानेवारी २०२३चे आहे. आयपीएल २०२२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील मॅचमध्ये हा चाहता पोस्टर घेऊन पोहोचला होता, ज्यामध्ये लिहिले होते की जोपर्यंत विराट त्याचे ७१वे शतक पूर्ण करत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही.

खरंतर या चाहत्याचा दावा आहे की, विराट कोहलीने त्याच्या लग्नाच्या दिवशी त्याचे ७४वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. शेरवानी परिधान केलेल्या या ट्विटर हँडल वापरकर्त्याने आपला नवीनतम फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली रविवारी टीव्हीवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शतक साजरे करताना दिसत आहे. ही दोन छायाचित्रे शेअर करताना या ट्विटर हँडलवरून लिहिले आहे की, “मी ७१वे शतक मागितले होते, पण माझ्या जन्मदिनाच्या खास दिवशी त्याने ७४वे शतक ठोकले.” नोव्हेंबर २०१९ नंतर, विराटचे आंतरराष्ट्रीय शतक जवळपास तीन वर्षांनी बाहेर आले. विराटने ८ सप्टेंबर २०२२ रोजी ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. विराटच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

‘एका शतकानंतर सलग शतके’

विराटने या व्हिडिओत म्हटले होते की, “मला माहिती आहे की, जेव्हा मी या काळातून बाहेर येईल, तेव्हा किती लक्ष केंद्रित करू शकतो. मला माहिती आहे की, एकदा मोठी धावसंख्या केल्यानंतर मी प्रेरित होईल. एक शतकानंतर तो एकापाठोपाठ एक असेल. काही महिने विचलित न होता मी हे करू शकतो. मला माहिती आहे की, एकापाठोपाठ शतक झळकावण्यासाठी माझ्याकडे असे काहीतरी आहे, ज्याने मी प्रेरित होऊ शकतो. मला माहिती आहे की, मी अजूनही संघासाठी माझे योगदान देऊ शकतो आणि संघाला विजय मिळवून देऊ शकतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 11:32 IST
Next Story
आगळय़ा रणनीतीनंतरही न्यूझीलंडचा पराभव
Exit mobile version