Virat Kohli Asia Cup IND vs PAK: आशिया चषकातील बहुप्रतीक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान सलग दोन वेळा रद्द होऊन अखेरीस आज कोलंबो मध्ये पार पडत आहे. सुपर चार मधील या सामन्यासाठीची करावी लागलेली प्रतीक्षा पूर्णपणे फळाला आली अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण होईल असा काहीसा खेळ आज पाहायला मिळाला. तब्बल सहा महिन्यांनी वापसी केलेला के. एल राहुल आज मैदानात चमकला. शतकपूर्ती करून नाबाद राहिलेल्या के. एलने आज अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. त्याच्या जोडीने आज किंग कोहलीने शतकासह मोठ्या विक्रमला गवसणी घातली. आज विराटने आपले ४७ वे शतक पूर्ण केले तसेच १३,००० धावांचा टप्पा सर्वाधिक वेगाने गाठणारा तो पहिला खेळाडू ठरला. २४ शतकांपासून पुढे सुरु झालेल्या या सामन्यात पाऊस अद्याप तरी शांत आहे मात्र विराट व राहुलच्या धावांचा पाऊस सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर याने विराटच्या जबरदस्त शतकानंतर अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक ट्वीट शेअर केले आहे. आणि आमच्यासाठी विराट कोहली हा या ट्वीटप्रमाणेच असल्याचे सुद्धा म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले होते की, “हळू, हळू आणि काळजीपूर्वक चालत राहा आणि मग असा पलटवार करा जसं की तुम्हीच जगातील सर्वात वेगवान प्राणी आहात.” ट्रम्प यांनी हे ट्वीट तब्बल १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१३ मध्ये केले होते. मात्र जाफर यांनी आजही हे ट्वीट कसे परफेक्ट उदाहरण ठरत आहे हे दाखवले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Video: विराट कोहलीचं ४७ वं शतक

दरम्यान, भारताने ५० षटकांच्या शेवटी ३५६ धावा पूर्ण करून पाकिस्तानला ३५७ धावांचे आव्हान दिले आहे. आजच्या सामन्यात दुखापतीमुळे पाकिस्तानने हरीस रौफला बाहेर ठेवले होते. शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानला खूप विश्वास होता पण आज विराट व राहुलच्या वादळी खेळीपुढे आफ्रिदीची हवा टिकूच शकली नाही