भारतातील ‘हॉट अँड फिट’ जोडी म्हणून ओळखली जाणारी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या जोडप्यांपैकी एक आहेत. चाहत्यांचं मनोरंजन कसं करावं हे या जोडीला बरोबर ठाऊक आहे. चाहत्यांची ‘विरुष्का’ ही जोडी सध्या लॉकडाउनमध्ये घरातच आहे. पण तरीही चाहत्यांच्या सातत्याने संपर्कात कसं राहायचं याची कला दोघांनाही चांगलीच अवगत आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या अनुष्काने इन्स्टाग्रामवर आज एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडीओमध्ये अनुष्का आणि विराटने एकमेकांना प्रश्न विचारले. महत्त्वाचं म्हणजे यात विराटला बॉलिवूडच संबंधित प्रश्न विचारण्यात आले. तर अनुष्काला क्रिकेटशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. पाहा हा धमाल व्हिडीओ-
त्यातले काही प्रश्न म्हणजे…
विराट कोहली – कोणत्या महिला क्रिकेटरने सर्वाधिक वन डे बळी मिळवले आहेत?
अनुष्का – तुला काय वाटतं.. मला उत्तर माहित असेल?
कोहली – नाही
अनुष्का – झूलन गोस्वामी हे उत्तर आहे…
कोहली – कोणत्या मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हणतात?
अनुष्का – लॉर्ड्स
अनुष्काने कोहलीला बॉलिवूडशी संबंधित काही प्रश्न विचारले.
अनुष्का – पहिल्या हिंदी फीचर चित्रपटाचे नाव काय?
कोहली – मला माहित नाही
अनुष्का – (अखेर तिनेच उत्तर दिलं) राजा हरिश्चंद्र
अनुष्का – क्रिकेट वर आधारित २ चित्रपटांची नावं सांग.
कोहली – पटियाला हाऊस आणि लगान
असे अनेक मजेशीर प्रश्न आणि उत्तर या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना ऐकायला मिळाली.