Virat Kohli Anushka Sharma London Viral Video: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या वनडे कारकिर्दीतील भविष्याबाबत चर्चा सुरू आहे. विराट आणि रोहित शर्मा हे दोघे दिग्गज खेळाडू वनडे क्रिकेट खेळत राहणार आहेत. पण वनडे वर्ल्डकपपर्यंत दोघे संघाचा भाग असणार का अशी चर्चा आहे. दरम्यान विराट कोहली आणि पत्नी अनुष्काचा लंडनमधील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.
सर्व चर्चा आणि वेगवेगळ्या अफवांपासून दूर, विराट कोहली लंडनमध्ये त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहे आणि तिथला त्याचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो त्याची पत्नी अनुष्का शर्मासह फिरताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये स्थायिक झालेला विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. विशेषतः कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे, त्याला मैदानावर पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. तसेच, तो क्वचितच कोणत्याही कार्यक्रमात दिसतो. अशातच त्याची एखादी झलक असलेला फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर दिसला तरी तो लगेच व्हायरल होतो.
विराट-अनुष्काचा लंडनमधील VIDEO होतोय व्हायरल
विराट कोहली अनुष्काबरोबर लंडनच्या रस्त्यांवर फिरतानाचा हा व्हीडिओ आहे. विराट-अनुष्का दोघे एकत्र असले तरी मुलं मात्र त्यांच्याबरोबर या व्हीडिओमध्ये नाहीत. या व्हिडिओमध्ये विराट टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला दिसत आहे आणि त्याच्या हातात पाण्याची बाटली आणि छत्री आहे. यावरून तो कदाचित जिम करून आला असावा किंवा काही सामान घेण्यासाठी बाहेर पडल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान विराट-अनुष्काबरोबर एक जोडपदेखील आहे. ज्यांच्याबरोबर हे दोघेही रस्त्यात थांबून बोलताना दिसत आहेत. एका भारतीय चाहत्याने हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हीडिओमधून विराट आणि अनुष्का लंडनमध्ये एक साधारण जीवन जगत आहेत. ज्याबद्दल ते नेहमी उल्लेख करत असतात. याच कारणामुळे दोघेही लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत.
विराट कोहली आता आशिया चषक २०२५ नंतर होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिका खेळणार आहे. यापूर्वी विराट कोहली आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात खेळताना दिसला होता.