Virat Kohli Blocked Glenn Maxwell on Instagram: ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल गेली अनेक वर्षे विराट कोहलीबरोबर आरसीबी संघाचा भाग आहे. विराट आणि ग्लेन दोघेही खूप घट्ट मित्र आहेत. क्रिकेट मैदानावर आणि मैदानाबाहेरही याचा प्रत्यत आपल्याला आला आहे. मॅक्सवेलला RCB ने आयपीएल २०२१ च्या आधी १४.२५ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत सामील केले होते. या हंगामात, मॅक्सवेलने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आणि आरसीबीला प्लेऑफमध्ये नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी मॅक्सवेल पंजाब किंग्स संघाचा भाग होता. पण आता एका पोडकास्टमध्ये बोलताना मॅक्सवेलने कोहलीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

मॅक्सवेलने ListNR स्पोर्ट्स पॉडकास्टवर बोलताना सांगितलं, “जेव्हा मला कळलं की मी RCB मध्ये जात आहे, तेव्हा विराट हा पहिला होता, ज्याने मला मेसेज करत संघात माझे स्वागत केले. नंतर जेव्हा मी आयपीएलपूर्वीच्या प्रशिक्षण शिबिरासाठी गेलो होतो, तेव्हा आम्ही गप्पा मारल्या आणि प्रशिक्षणादरम्यान बराच वेळ घालवला. त्यामुळे त्यानंतर मी सोशल मीडियावर त्याला फॉलो करण्यासाठी गेलो. यापूर्वी मी कधी विचार केला नव्हता की त्याला फॉलो करू. माझ्या डोक्यातही तसं कधी आलं नव्हतं.

हेही वाचा – IND vs NZ: भारताविरूद्ध मालिका विजयानंतर न्यूझीलंड संघाला बसला धक्का, मुंबई कसोटीतून ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर

पुढे सांगताना मॅक्सवेल म्हणाला, मला हे माहिती होतं की तो सोशल मीडियावर तो असणारच. त्यामुळे मी आधी फार काही विचार केला नव्हता. पण जेव्हा मी सोशल मीडियावर सर्च करत होतो त्याला पण त्याचं अकाऊंट कुठेच दिसेना. त्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की त्याने कदाचित तुला इन्स्टाग्रावर ब्लॉक केलं असावं आणि म्हणूनच तू सर्च करूनही तुला तो दिसत नसेल. मला वाटलं असं काही नसेल.

हेही वाचा – IND vs NZ: “सचिन तेंडुलकर ४० व्या वर्षी…”, न्यूझीलंडविरूद्ध अपयशी ठरलेल्या रोहित-विराटला सचिनचं उदाहरण देत चाहत्यांचा तिखट सवाल

पुढे मॅक्सवेल कोहलीबरोबर याबाबत बोलला आणि त्याने कोहलीला विचारलं, तेव्हा दोघांमधील बोलणं सांगताना मॅक्सवेल म्हणाला, त्यानंतर मी गेलो आणि कोहलीला विचारलं, तू मला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहेस का आणि तो म्हणाला, हो, मी तेव्हा ब्लॉक केलं होतं, जेव्हा तू कसोटी सामन्यात मला चिडवलं होतस, मी तेव्हा वैतागलो होतो आणि मग तुला सोशल मीडियावर ब्लॉक करायचं ठरवलं. त्यानंतर मी म्हटलं ठीके आणि मग त्याने मला अनब्लॉक केलं, त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो.

हेही वाचा – IPL 2025 Auction: ऋषभ पंत, श्रेयस अय्यर ते केएल राहुल… ‘या’ ५ मोठ्या खेळाडूंना संघ करू शकतात रिलीज, काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीने मॅक्सवेलला इन्स्टाग्रामवर का केलं होतं ब्लॉक?

२०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांकडून बरीच आक्रमकता पाहायला मिळाली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. यावेळी क्षेत्ररक्षण करताना ग्लेन मॅक्सवेलने खांदा धरून कोहलीची त्याची खिल्ली उडवली. त्यामुळे कोहली संतापला होता. तेव्हा कोहलीने त्याला ब्लॉक केले होते. पण मॅक्सवेलबरोबर बोलल्यानंतर कोहलीने त्याला अनब्लॉक केलं.