Virat Kohli Breaks Sachin Tendulkar and Ricky Pontig record: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात कोहलीची बॅट पुन्हा एकदा धावांचा पाऊस पाडताना ५०वे वनडे शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तसेच या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध इतिहास रचला आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिगचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. विराट कोहली आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. कोहलीने दिग्गज पाँटिंगला मागे टाकले आहे.

विराटने पहिल्यांदाच कामगिरी केली ही कामगिरी –

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोहलीने प्रथमच दुहेरी अंकी धावसंख्या गाठली. याआधी कोहलीने २०११ च्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध ९ धावा केल्या होत्या. २०१५ मध्ये विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त १ धाव करता आली होती आणि २०१९ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध त्याला फक्त 1 धाव करता आली होती, पण २०२३ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत विराट कोहलीने शतक झळकावले आहे. या शतकाच्या जोरावर विराटने सर्वाधिक एकदिवसीय धावांच्या बाबतीत रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे.

Mohit Sharma Unwanted Record
DC vs GT : ऋषभने धुलाई करताच, मोहित शर्मा ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: रोहित शर्माने तोडला पोलार्डचा मोठा विक्रम, मुंबईसाठी हा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: विराट कोहलीला आऊट करत घेतली आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट, कोण आहे मनिमरण सिध्दार्थ?
list of fastest bowlers in IPL 2024 and whole History
उमरान मलिकचा विक्रम मोडणार मयंक यादव? IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? पाहा यादी

विराट कोहलीने रिकी पाँटिंगला टाकले मागे –

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर (१८४२६) अव्वल स्थानी आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा (१४२३४) दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (१३७०४) धावांसह तिसर्‍या स्थानावर होता, पण आता कोहली (१३७९४) पाँटिंगला मागे टाकून तिसऱ्या स्थानावर आला आहे. या सामन्यात विराट कोहली सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम मोडला आहे. आता त्याच्या नावावर वनडेत ५० शतकांची नोंद आहे.

हेही वाचा – विराट कोहलीच्या ५० व्या शतकाचा क्षण ‘इथे’ पुन्हा पाहा; अनुष्का व सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया बघून भारावून जाल

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला टाकले मागे –

सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडत विराट कोहलीने वर्ल्डकप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत ५०व्या शतकाला गवसणी घातली. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर धाव घेत विराटने हा विक्रम नावावर केला. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. बुधवारी मुंबईत उष्ण आणि आर्द्र वातावरणातही विराटने संयमी खेळ करत खणखणीत शतकाची नोंद केली.

हेही वाचा – विराट कोहलीची ५० व्या शतकानंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “आज मैदानात अनुष्का होती आणि मला..”

विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं ८० वं शतक आहे. कसोटी प्रकारात विराटच्या नावावर २९ तर टी-२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिल्यावहिलं शतक झळकावलं होतं. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटचं वनडेतलं न्यूझीलंडविरुद्धचं हे सहावं शतक आहे. मायदेशातलं कोहलीचं हे २२वं शतक आहे.