कोहलीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शतक ठोकू देणार नाही, अशी दर्पोक्ती करून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला आठवडा झाला असतानाच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली याने मात्र कमिन्सचे दात घशात घातले आहेत. विराट केवळ एक शतक नाही, अनेक शतके ठोकेल, असा विश्वास ब्रेट ली याने व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रलियामध्ये ३ टी२०, ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियात एकही शतक झळकावू शकणार नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात सपाटून मार खाईल. भारतीय उपखंडात विराट कोहलीचा धडाकेबाज फॉर्म कायम होता. मात्र कोहलीची ही जादू ऑस्ट्रेलियात चालणार नाही, असे वक्तव्य कमिन्सने केले होते.

मात्र ली याने याबाबत वेगळे मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत ब्रेट ली म्हणाला की २९ वर्षीय कोहली हा नक्कीच ऑस्ट्रेलियात सफल ठरेल. त्याच्या एवढा धावांसाठी भुकेलेला खेळाडू मी अद्याप पाहिलेला नाही. कोहलीला स्वतःला अद्याप सिद्ध करायचे आहे. पण तो नक्की स्वतःला सिद्ध करेल आणि चांगला खेळ करेल.कोहलीचे हे वर्ष उत्तम असेल. तो एकच नव्हे तर अनेक शतकं करेल, असेही ब्रेट ली म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli brett lee pat cummins australia tour hundreds
First published on: 17-07-2018 at 19:17 IST