scorecardresearch

Virat Kohli: चर्चा तर होणारच! इयत्ता नववीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत किंग कोहलीबद्दल विचारण्यात आला प्रश्न, सोशल मीडियावर व्हायरल

आशिया चषक २०२२ मध्ये शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीचा आनंद साजरा करतानाचा फोटो व्हायरल होत आहे कारण इयत्ता नववी मध्ये याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

Virat Kohli: Question asked about Virat Kohli in class IX English paper picture went viral on social media
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो आणि त्याची आकडेवारी स्वतःच बोलते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७६ शतके आणि २५,००० हून अधिक धावा करणे सोपे नाही आणि फार कमी क्रिकेटपटूंना असे करणे शक्य झाले आहे. विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीत एक अत्यंत वाईट टप्पा होता जेव्हा तो शतक झळकावण्याची तळमळ-तडफड करत होता, पण तीन वर्षांनी तो हा अडथळा पार करण्यात यशस्वी झाला आणि २०२२ च्या आशिया चषकमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० सामन्यात त्याने शतक झळकावले. त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी देखील आहे. याआधी विराट कोहलीने २०१९ साली बांगलादेशविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते.

विराट कोहलीने २०१९ सालानंतर दुबईत आशिया चषक २०२२च्या सुपर फोर सामन्यात अफगाणिस्तान विरुद्धच्या टी२० सामन्यात शतक झळकावले होते आणि त्यानंतर त्याला काही करता आले नाही. मागे वळून पाहिलं आणि सध्या तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि संघासाठी धावा करत आहे. आता आशिया चषक २०२२ मध्ये विराट कोहलीच्या शतकाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वास्तविक, हा फोटो व्हायरल होण्याचे कारण म्हणजे नववीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये कोहलीचा तो फोटो दाखवण्यात आला आहे आणि तो फोटो पाहून या भारतीय क्रिकेटपटूचे १००-१२० शब्दांत वर्णन करण्याचा प्रश्न आहे. लोकांना कोहलीचे हे छायाचित्र खूप आवडते असून कोणीतरी लिहिले की “जेव्हा तुमचे यश संपूर्ण पिढीला प्रेरणा देते तेव्हा ती अभिमानाची बाब आहे.”

हेही वाचा: WPL 2023: “हम लोगो ने थोडी ना रस्सी…”, पहिल्यावहिल्या WPL मध्ये मारलेल्या चौकार-षटकारांच्या आतिषबाजीवर हरमनप्रीतचे सडेतोड उत्तर

विराट कोहलीने २०२२ च्या आशिया चषकमध्ये झळकावलेले शतक हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील ७१ वे शतक होते. त्याचवेळी, आशिया चषक २०२२ पासून, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके ठोकली आहेत आणि १५०० हून अधिक धावाही केल्या आहेत. विराट कोहलीच्या एकूण शतकांची संख्या आता ७६ झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात सचिन तेंडुलकर विराट कोहलीच्या पुढे आहे, त्याच्या नावावर १०० शतके आहेत. विराट कोहली आता आयपीएल २०२३ मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 15:10 IST

संबंधित बातम्या