Virat Kohli Bihar Fan Marksheet Viral : क्रिकेट चाहते अनेकदा त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंसाठी काय करतील याचा नेम नाही. ते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंसाठी काहीही करायला तयार असतात. आता बिहारचा रहिवासी असलेल्या विराट कोहलीच्या एका मोठ्या चाहत्याचे प्रकरण समोर आले आहे. वास्तविक, एका शाळकरी मुलाची मार्कशीट इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने त्याचे नाव ‘विराट कोहली’ असे नमूद केले आहे. त्याचबरोबर त्याने त्याच्या आईचे नाव म्हणून विराटच्या आईचे नाव नमूद केले आहे. आता त्याची मार्कशीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या मार्कशीटमध्ये या मुलाने त्याचे नाव विराट कोहली, आईचे नाव सरोज कोहली, वडिलांचे नाव प्रेमनाथ कोहली आणि शाळेचा कोड ’18 RCB’ लिहिला आहे. 18 हा विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आहे. कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) कडून खेळत असल्याने, मुलाने परीक्षेत आपल्या वर्गाचे नाव ‘आरसीबी’ असे लिहिले आहे. रोल नंबर १८ आहे आणि शिफ्ट ऐवजी ओपनिंग लिहिले आहे. कारण कोहली आरसीबीसाठी ओपन करतो.

याशिवाय प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ४ पर्याय दिले जातात. त्यामध्ये पण जबरदस्त सर्जनशीलता दाखवणाऱ्या या मुलाने गोळे अशा प्रकारे भरले आहेत की एकत्र केल्यावर ’18 RCB’ तयार होते. या मार्कशीटवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी या मुलाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Imane Khelif : स्त्री की पुरूष खेळाडू या वादामुळे चर्चेत आलेल्या इमेन खलिफने सुवर्णपदक जिंकल्यानंतर उचलले मोठे पाऊल, जाणून घ्या काय केलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहलीच्या चाहत्याने विचित्र गोष्टी करून चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिलसांपूर्वी तामिळनाडूमध्ये जोरदार वादानंतर रोहित शर्माच्या एका चाहत्याची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे या मार्कशीटमुळे लोकांनी आता विराट कोहलीला ट्रोल करायला सुरुवात केल्याने हद्दच झाली आहे. कारण आतापर्यंत विराट कोहलीच्या आरसीबी संघाला एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र, या पराक्रमामुळे आता मुलाला नापास व्हावे लागणार आहे.