Virat Kohli Knew About Steve Smith’s Retirement Decision: भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत कांगारू संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर केले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या ऑस्ट्रेलिया संघाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर होती. पण भारताकडून चॅम्पियन्स् ट्रॉफीतील पराभवानंतर स्टीव्ह स्मिथने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पण कसोटी क्रिकेट आणि टी-२० मध्ये तो क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

दुखापतग्रस्त पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या स्मिथने उपांत्य फेरीच्या सामन्यात ९६ चेंडूत ७३ धावा केल्या होत्या. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथ कोहलीला भेटताना दिसत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांना हात मिळवत भेटत असताना स्मिथ आणि विराटच्या या व्हीडिओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

विराट आणि स्मिथ भेटताच एकमेकांशी काहीतरी बोलतात आणि थोडे भावुक होत एकमेकांना मिठी मारतात आणि शुभेच्छा देताना दिसतात. या व्हायरल व्हीडिओवरून विराटला स्मिथने निवृत्ती घेण्याआधीच त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाची कल्पना दिल्याचे म्हटले जात आहे. स्मिथने त्याचा निर्णय सांगितल्यानंतर कोहली कोहलीच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रियाही बदलल्या आणि दोघेही एकमेकांना मिठी मारत भावुक झालेलं पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये विराट स्मिथला भेटताच तुझा शेवटचा सामना होता का? असं विचारताच स्मिथ विराटला पकडून हो म्हणताच विराट भावूक होऊन त्याला मिठी मारताना दिसला.

स्मिथ म्हणाला, “आता विश्वचषक २०२७ ची तयारी सुरू करण्याची संधी आहे, त्यामुळे मला वाटलं की इतरांसाठी मार्ग मोकळा करण्याची हीच योग्य वेळ आहे.” तो म्हणाला, “कसोटी क्रिकेटला प्राधान्य आहे आणि मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी खूप उत्सुक आहे. यानंतर आम्हाला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१० मध्ये लेग-स्पिन अष्टपैलू म्हणून पदार्पण केल्यानंतर, स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी १७० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३ धावा केल्या. २८ च्या सरासरीने १२ शतकांसह ५८०० धावा केल्या. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग आणि निवड समितीचे प्रमुख जॉर्ज बेली यांनी स्मिथच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील योगदानासाठी कौतुक केले.