विराट कोहली आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील १०० वी कसोटी खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३८ धावा करत विराट कोहलीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कसोटी क्रिकेटमधील ८ हजार धावांचा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार धावा करणारा विराट कोहली भारताचा सहावा खेळाडू आहे. याआधी आधी सचिन तेंडुलकर, द वॉल राहुल द्रविड, लिटल मास्टर सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार धाव करण्यासाठी १६९ डाव घेतले. हा टप्पा सचिन तेंडुलकरने १५४ डावांमध्ये गाठला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे तर, श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८ हजार धावा करण्याचा विक्रम आहे. ८ हजार धावा करण्यासाठी त्याने १५२ डाव घेतले. राहुल द्रविडने १५८, वीरेंद्र सेहवागने १६० आणि सुनील गावस्करने १६६ डावात हा पराक्रम केला.

वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या २५ सामन्यांमध्ये ४३ डाव खेळले आणि ४४.३५ च्या सरासरीने १७३० धावा केल्या. त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्या टप्प्यातील २५ सामन्यांमध्ये विराटने हे सिद्ध केले की, फलंदाजीसाठी तयार झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ४३ डावांत ५१.४५ च्या सरासरीने २१६१ धावा केल्या. यादरम्यान त्याने कसोटीत आठ शतके आणि चार अर्धशतके झळकावली. या दरम्यान कसोटी संघाची कमानही त्याच्या हाती आली होती. तेव्हापासून त्याच्या कसोटी कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरू झाला. आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या २५ सामन्यांमध्ये विराटची बॅट चांगलीच तळपली. विराटच्या नेतृत्वाखालील संघाने परदेशात जाऊन सामने जिंकून अनेक विक्रम केले. विराटने ४२ डावांमध्ये ६७.१० च्या सरासरीने २६१७ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटने ११ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. यादरम्यान त्याने ६४ टक्के अर्धशतकांचे शतकांमध्ये रूपांतर झाले. क्रिकेटवर राज्य केल्यानंतर विराट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. नोव्हेंबर २०१९ पासून त्याने एकही शतक झळकावलेले नाही. यादरम्यान त्याची सरासरीही घसरली असून भारतीय संघाचे तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदही त्याच्या हातून गेले आहे. विराटने आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या २४ सामन्यांमध्ये ४० डाव खेळले असून ३८.२६ च्या सरासरीने १४५४ धावा केल्या आहेत. यावेळी केवळ दोनच शतके झळकली आहेत. त्याचबरोबर त्याने नऊ वेळा अर्धशतकी खेळी खेळली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli made 8000 runs in test cricket rmt
First published on: 04-03-2022 at 13:24 IST