भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. Wisden च्या cricketers of decade या यादीत विराटचा TOP 5 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. विराट कोहलीसोबत डेल स्टेन, एबी डिव्हीलियर्स, स्टिव्ह स्मिथ आणि महिला क्रिकेटपटू एलिस पेरीचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“गेल्या १० वर्षात विराट कोहलीने तब्बल ५ हजार ७७५ धावा ठोकल्या आहेत. वेळोवेळी विराटने आपल्यासमोरील आव्हानांवर मात करुन स्वतःच्या खेळात सुधारणा केली आहे. ५ वर्षांच्या कालावधीत विराटने ६३ च्या सरासरीने धावा काढल्या असून या दरम्यान त्याने २१ शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. याच कारणासाठी विराटचा या यादीत सहभाग करण्यात आलेला आहे”, Wisden ने स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, दशकातीला ११ सर्वोत्तम कसोटीपटूंच्या यादीतही विराटला स्थान मिळालं आहे. जाणून घेऊयात विस्डनच्या यादीतील, दशकातील सर्वोत्तम ११ क्रिकेटपटू –

१. अ‍ॅलिस्टर कूक (इंग्लंड)

२. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)

३. कुमार संगाकारा (श्रीलंका)

४. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)

५. विराट कोहली (भारत)

६. बेन स्टोक्स (इंग्लंड)

७. एबी डी व्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका)

८. रविचंद्रन अश्विन (भारत)

९. डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)

१०. कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)

११. जेम्स अँडरसन (इंग्लंड)

 

विराटची या दशकातील आकडेवारी –

  • धावा – ११ हजार १२५
  • शतके – ४२
  • अर्धशतके – ५२
  • सामनावीर पुरस्कार – ३५
  • मालिकावीर पुरस्कार – ७
  • चौकार – १०३८
  • झेल – ११७
  • सामने – २२७
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli named in wisden cricketers of the decade list psd
First published on: 26-12-2019 at 12:42 IST