India vs Australia 2023 1st ODI Match Updates in Marathi : बॉर्डर गावसकर टॉफ्रीत रंगलेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला. आख्ख्या क्रिकेटविश्वातून नजरा लागलेला अमहमदाबादचा चौथा कसोटी सामना रद्द झाला. पण आता नव्या जोशात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया आणि भारत एकदिवसीय मालिकेसाठी आमनेसामने आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकददिवसीय मालिका आजपासून सुरु होत आहे. वानखेडे मैदानात या मालिकेतील पहिला सामना आज १७ मार्चला खेळवला जात असून भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्यात रोहित शर्मा नेतृत्व करणार नसून भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारतात आगामी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका अंत्यंत महत्वाची आहे. काही भारतीय खेळाडूंना विश्वचषकात जागा पक्की करण्यासाठी या मालिकेत चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. तसंच दोन्ही संघांना आजच्या सामन्यात नवीन तीन विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या आजच्या सामन्यात कोणते तीन विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

AUS vs PAK Fans Make Fun Of Mohammad Rizwan As He Holds Pat Cummins' Hand
AUS vs PAK : ‘प्लीज मला हरवू नकोस हां…’, पॅट कमिन्सच्या हातावर हात ठेवल्याने मोहम्मद रिझवान ट्रोल, मीम्सना उधाण
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
AUS vs PAK Match Updates Australia vs Pakistan 1st ODI
AUS vs PAK : पाकिस्तानची झुंज अपयशी, अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत मिळवला रोमहर्षक विजय
The New Zealand team defeated the Indian team in the test match sport news
सपशेल अपयशाची नामुष्की; फिरकीपुढे भारताची पुन्हा दाणादाण
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
IND A vs AUS A Ishan Kishan in Trouble as India A team accused of ball tampering
IND A vs AUS A : धक्कादायक! ऑस्ट्रेलियात टीम इंडियावर ‘बॉल टॅम्परिंग’चा आरोप, पंचांशी वाद घातल्याने इशान किशन अडचणीत

शुबमन गिलला हा विक्रम करण्याची संधी

गेल्या काही दिवसांपासून मैदानात धावांचा पाऊस पाडणारा टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल प्रकाशझोतात आला आहे. आजच्या सामन्यातही त्याला हिरो बनण्याची संधी आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकून शुबमनने त्याच्या अप्रतिम फलंदाजीचा ठसा याआधीच उमटवला आहे. पण आजच्या सामन्यात शुबमनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीस नवीन विक्रम करण्याची संधी आहे. २०२२ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत शुबमनने ९२३ धावा ठोकल्या. यामध्ये एकदिवसीय सामन्यात ५६७, टी-२० मध्ये २०२ आणि कसोटीत १५४ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात शुबमनने ७७ धावांची खेळी केल्यास गिल २०२३ मध्ये तिन्ही फॉरमॅटमध्ये १ हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.

स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय मालिकेचं नेतृत्व करत आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 139 एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५.११ च्या सरासरीनं ४९१७ धावा केल्या आहेत. त्यामुळे या फॉरमॅटमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी स्मिथला ८३ धावांची आवश्यकता आहे. आजच्या सामन्यात स्मिथने ८३ धावांची खेळी केली, तर स्मिथ एकदिवसीय सामन्यांत ५ हजार धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा १७ वा फलंदाज ठरेल. परंतु स्टीव्ह स्मिथ आजच्या सामन्यात हार्दिक पांड्यांच्या गोलंदाजीवर २२ धावांवर बाद झाल्याने त्याला नवीन विक्रम करता आला नाही.


विराट कोहलीच्या नावावर या विक्रमाची नोंद होणार?

एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये धावाांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीला आजच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात नवीन विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. विराटने आजच्या सामन्यात ८२ धावांची खेळी केल्यास भारत-ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त धावा करण्याच्या शर्यतीत विराट तिसऱ्या स्थानावर येईल. आता हा विक्रम रिकी पॉंटिंगच्या नावावर आहे. पॉंटिंगने भारताविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये २१६४ धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर २०८३ धावांची नोंद आहे. तर पहिल्या स्थानावर भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडूकरने नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने ३०७७ धावा कुटल्या आहेत.