Virat Kohli Ken Williamson Wicket Video: भारताचा विराट कोहली आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन हे आग व बर्फासारख्या स्वभावाचे प्रतिस्पर्धी आज चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळत आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हे जुने प्रतिस्पर्धी व जवळचे मित्र एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या आधी कोहलीने १५ वर्षांपूर्वी केन विल्यमसनची घेतलेली विकेट चर्चेत आली आहे. याचा एक व्हिडीओ व त्यावर कोहलीच्या प्रतिक्रियेची काहांशी क्लिप हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्सवर दाखवण्यात आली होती. तर सोशल मीडियावर सुद्धा कोहलीने हाच प्लॅन आता पुन्हा अंमलात आणायला हवा अशी मागणी चाहते करत आहेत.

कोहली आणि विल्यमसन २००८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते, त्या वेळी भारत विजेता ठरला होता. या सामन्यात किंग कोहलीने गोलंदाजी करताना केन विल्यमसनला बाद केले होते. याच सामन्यात कोहलीने सामनावीराचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता. त्यानंतर काही वर्षांनी कोहलीला याबाबत एका पत्रकार परिषदेत विचारणा केली असता तेव्हा त्याने मला ही विकेट घेतल्याचं आठवतच नाही असं म्हटलं होतं, आणि आता पुन्हा कधी हे शक्य होईल माहित नाही असंही कोहली म्हणाला होता.

किंग कोहली व केन विल्यमसन हे मैदानात जरी प्रतिस्पर्धी असले तरी खेळाव्यतिरिक्त ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असल्याचे दोघांनीही सांगितले आहे. विराट म्हणतो, की “माझा दृष्टिकोन, विचार करण्याची पद्धत ही केनशी बरीच मिळतीजुळती आहे त्यामुळे जर आज माझे कामाव्यतिरिक्त कोणी खेळाडू मित्र असतील तर त्यात केनचं नाव नक्कीच घेईन.”

Video: विराट कोहलीने घेतली केन विल्यमसनची विकेट

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कोहलीने २०११ मध्ये पाकिस्तानविरुद्ध प्रथम उपांत्य फेरी गाठली होती. त्याचे पुढील चार सामने २०१५ आणि २०१९ मध्ये पराभवानेच संपुष्टात आले. तर विल्यमसननेही २०११ मध्ये विश्वचषकात पदार्पण केले होते. पण श्रीलंकेकडून त्याच्या संघाचा पराभव झाला. २०१५ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामना जिंकला. पण अंतिम फेरीत किवीजचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला.२०१९ मध्ये, अंतिम फेरीत इंग्लंडकडून पराभूत होण्याआधी विल्यमसनच्या संघाने भारतालाच खेळातून बाहेर काढले होते.