scorecardresearch

विराट कोहली vs रोहित शर्मा वादामुळे संघात फूट पडताच रवी शास्त्री यांनी थेट.. माजी प्रशिक्षकांचा मोठा खुलासा

Rohit Vs Virat: श्रीधर लिहितात की, पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये जे घडले ते वाईटच होते. आम्हाला माहिती मिळाली की संघात रोहित कॅम्प आणि विराट कॅम्प होता, कोणीतरी सोशल मीडियावर

Virat Kohli Vs Rohit Sharma Fight Divides Team Ravi Shastri Angry Shocking Revelation in Coaching Beyond By Shridhar
विराट कोहली vs रोहित शर्मा वादामुळे संघात फूट पडताच रवी शास्त्री.. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rohit Sharma Vs Virat Kohli Fight: रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेट संघाचे दोन आधारस्तंभ आहेत असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. या दोघांमध्ये सध्या अगदी घट्ट मैत्री आहे. २००८ पासून कोहली व रोहित एकत्र खेळत आहे. एकमेकांसह तब्बल १४ वर्ष खेळत असताना मध्यंतरी असा काळ आला होता जेव्हा भारतीय संघातच फूट पडल्याच्या अफवा पसरत होत्या. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यातील वादामुळे टीमच्या अंतर्गत दोन गट झाले होते अशाही चर्चा होत्या. या वादामुळे टीममधील अन्य खेळाडू सुद्धा विभागले गेले होते. २०१९ च्या विश्वचषकादरम्यान या चर्चा पसरू लागल्या होत्या तर २०२१ च्या उत्तरार्धात कोहलीला भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पुन्हा या चर्चाना उधाण आले होते. हे प्रकरण नेमके कसे मार्गी लागले याविषयी कोचिंग बियॉंड या पुस्तकात काही खुलासे करण्यात आले आहेत.

भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी त्यांच्या पुस्तकात रोहित आणि कोहली यांच्यातील वादाविषयी खुलासा केला आहे. परिस्थिती टोकाला जाण्यापूर्वी रवी शास्त्री यांनी मध्यस्थी केल्याचे श्रीधर यांनी म्हंटले आहे. “२०१९ च्या विश्वचषकाच्या दरम्यान, उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये जे घडले ते वाईटच होते. आम्हाला माहिती मिळाली की संघात रोहित कॅम्प आणि विराट कॅम्प होता, कोणीतरी सोशल मीडियावर दुसर्‍याला अनफॉलो केले होते.”

श्रीधर लिहितात की, लॉडरहिल येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी आम्ही विश्वचषकाच्या काही दिवसांनंतर युनायटेड स्टेट्स (यूएस) मध्ये पोहोचलो. रवीने आगमनानंतर विराट आणि रोहितला त्याच्या खोलीत बोलावले आणि चांगलीच कानउघाडणी केली. रवी म्हणाला की, “भारतीय क्रिकेट संघ एकसंध राहण्यासाठी तुम्ही दोघांनी एकत्र असणे गरजेचे आहे, सोशल मीडियावर जे झालं ते तिथेच ठेवा. तुम्ही दोघे सर्वात ज्येष्ठ क्रिकेटर आहात त्यामुळे हे थांबायलाच हवं” अशा शब्दात त्यांना समजावलं.

हे ही वाचा<< IND vs AUS आधी सिराज, उमरान मलिकचा हॉटेलमधील ‘हा’ Video पाहून फॅन्स भडकले; म्हणाले, “माज पाकिस्तानात..”

दरम्यान, श्रीधर म्हणतात की, “मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांनी मध्यस्थी केल्यावर कोहली आणि रोहितची गाडी पुन्हा रुळावर आली. हा वाद सुरुवातीला फार मोठा वाटला नाही पण नंतर कुरकुर वाढण्याचा धोका होता सुदैवाने शास्त्रींनी परिस्थिती हाताळली आणि कोहली आणि रोहित यांच्यातील संबंध सुधारले.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 10:44 IST