‘‘अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी मी कठोर निर्णय घेतले आहेत. जगातल्या तुल्यबळ खेळाडूंविरुद्ध मी पराभूत होत होते. गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अपयश पदरी पडल्यानंतर मी खेळाला अलविदा करण्याच्या विचारात होते,’’ अशी प्रांजळ कबुली सायना नेहवालने दिली.
‘‘तो माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कालखंड होता. तुझी कारकीर्द संपली आहे, असे मला अनेकजण सांगत होते. मी त्यानंतर बंगळुरूला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षक विमल कुमार यांनी मे महिन्यापर्यंत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. हे लक्ष्य मी मार्च महिन्यातच गाठले,’’ असे सायनाने सांगितले.
‘‘क्रमवारीतील अव्वल स्थान अविश्वसनीय आहे. मला प्रचंड आनंद झाला आहे. दीड वर्ष ली झेरुई क्रमवारीत अव्वल स्थानी होती. पण आता हे बदलणार आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे. पाच वर्षांपूर्वी मी दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती. त्यानंतर घसरण होऊन पाचव्या स्थानी स्थिरावले. त्यानंतर हळूहळू अव्वल स्थानापर्यंत पोहोचले आहे. प्रशिक्षक विमल कुमार आणि कुटुंबीय यांचा या यशात मोठा वाटा आहे,’’ असे सायनाने सांगितले.  नवी दिल्ली :‘‘अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी मी कठोर निर्णय घेतले आहेत. जगातल्या तुल्यबळ खेळाडूंविरुद्ध मी पराभूत होत होते. गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अपयश पदरी पडल्यानंतर मी खेळाला अलविदा करण्याच्या विचारात होते,’’ अशी प्रांजळ कबुली सायना नेहवालने दिली.
‘‘तो माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कालखंड होता. तुझी कारकीर्द संपली आहे, असे मला अनेकजण सांगत होते. मी त्यानंतर बंगळुरूला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षक विमल कुमार यांनी मे महिन्यापर्यंत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. हे लक्ष्य मी मार्च महिन्यातच गाठले,’’ असे सायनाने सांगितले.
‘‘क्रमवारीतील अव्वल स्थान अविश्वसनीय आहे. मला प्रचंड आनंद झाला आहे. दीड वर्ष ली झेरुई क्रमवारीत अव्वल स्थानी होती. पण आता हे बदलणार आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे. पाच वर्षांपूर्वी मी दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती. त्यानंतर घसरण होऊन पाचव्या स्थानी स्थिरावले. त्यानंतर हळूहळू अव्वल स्थानापर्यंत पोहोचले आहे. प्रशिक्षक विमल कुमार आणि कुटुंबीय यांचा या यशात मोठा वाटा आहे,’’ असे सायनाने सांगितले.