Washington Sundar 7 wickets and 5 bowled records in IND vs NZ 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी २४ ऑक्टोबरपासून पुण्यात खेळली जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांची वॉशिंग्टन सुंदरने भंबेरी उडवली, ज्यामुळे न्यूझीलंड संघाचा पहिला डाव २५९ धावांवर गडगडला. वॉशिंग्टन सुंदरने दमदार गोलंदाजी करताना ७ विकेट्स घेतल्या. यासह त्याने एका खास विक्रमाची नोंद केली आहे. तो एका डावात पाच फलंदाजांचा त्रिफळा उडवणारा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर ही कामगिरी कोणत्या चार गोलंदाजांनी केली आहे? जाणून घेऊया.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी वॉशिंगटनची भारतीय संघात निवड केली नव्हती, जो बंगळुरुत खेळला गेला, ज्यामध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. मात्र, बीसीसीआयने दुसऱ्या, तिसऱ्या कसोटीसाठी वॉशिंग्टन सुंदरला संघात सामील केले. यानंतर पुणे कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देत अचूक बदल केला. वॉशिंग्टन सुंदरनेही पहिल्याच डावात या मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि पाच विकेट्स घेत भेदक गोलंदाजी केली. सुंदरने न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुंग करण्यात मोठी भूमिका बजावली. वॉशिंग्टन सुंदरने पहिला पाच विकेट हॉल घेत त्याने एका डावात ७ विकेट्स घेतल्या आहेत. सुंदरने २३.१ षटकांत ५९ धावा देत ७ विकेट्स घेतल्या.

वॉशिंग्टन जडेजाच्या क्लबमध्ये झाला सामील –

वॉशिंग्टन सुंदरने ४५ महिन्यानंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करताना कहर केला. या गोलंदाजांने सातपैकी ५ फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आणि एका फलंदाज एलबीडब्ल्यू आणि एकाला झेलबाद केले. यासह सुंदर पुण्याच्या मैदानावर ७ विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. वॉशिंग्टन सुंदरने सर्वप्रथम रचिन रवींद्रला बाद केले. यानंतर त्याने डॅरिल मिशेलला एलबीडब्ल्यू केले. त्याने टॉम ब्लंडेलला क्लीन बोल्ड केले. ग्लेन फिलिप्सने त्याला अश्विनकरवी झेलबाद केले. तर टीम साऊथी आणि एजाज पटेल यांना क्लीन बोल्ड करत त्याने ७ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IND vs NZ : रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्नला मागे टाकत केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा गोलंदाज

भारतासाठी एका डावात ५ फलंदाजांना क्लीन बोल्ड करणारा वॉशिग्टन पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर चार गोलंदाजांनी हा पराक्रम केला आहे. भारतासाठी सर्वात पहिल्यांदा ही कामगिरी जसुभाई पटेल यांनी १९५९ मध्ये ऑस्ट्रेलियानविरुद्ध केली होती. त्यानंतर बापू नाडकर्णी, अनिल कुंबळे आणि रवींद्र जडेजाने ही कामगिरी केली आहे. आता वॉशिग्टन सुंदर या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

हेही वाचा – वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी! कर्दनकाळ रचिन रवींद्र पाठोपाठ टॉम ब्लंडेललाही केले क्लीन बोल्ड, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका डावात सर्वाधिक फलंदाजांना त्रिफळाचीत करणारे भारतीय गोलंदाज :

५ जसुभाई पटेल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कानपूर १९५९
५ बापू नाडकर्णी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रेबॉर्न १९६०
५ अनिल कुंबळे विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जॉबर्ग १९९२
रवींद्र जडेजा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दिल्ली २०२३
५ वॉशिंग्टन सुंदर विरुद्ध न्यूझीलंड, पुणे २०२४