संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी रात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केली.  बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १८ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह एकूण पाच फिरकी गोलंदांजांना संधी देण्यात आलीय. १८ पैकी तीन खेळाडू राखीव असून राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहरचा समावेश आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. चहलऐवजी फिरकी गोलंदाज म्हणून राहुल चहर प्राधान्य देण्यात आलं आहे. सध्या चहर हा मुंबई इंडियन्सच्या संघासोबत आबू धाबीमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्याचा सराव करत आहे. मात्र संघात स्थान मिळाल्याची बातमी आल्यानंतर चहरला सुरुवातीला त्यावर विश्वासच बसला नाही. ही गोड बातमी सांगतानाच व्हिडीओ मुंबई इंडियन्सने शेअर केलाय.

नक्की वाचा >> T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध विराट ‘या’ ११ खेळाडूंना संधी देण्याची शक्यता; ओपनिंगसाठी रोहितचा पार्टनर अनिश्चित

खरं तर युजवेंद्र चहलसारख्या अनुभव गोलंदाजाऐवजी संघात स्थान मिळाणं हे २२ वर्षीय चहरसाठी एखादं स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. तीन वर्षांपूर्वी त्याला न्यूझीलंडमध्ये १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी संधी मिळाली होती. मात्र त्याला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आल्याने एकदाही मैदानात उतरुन खेळण्याची संधी मिळाली नाही. आजही चहरला ही गोष्ट लक्षात आहे. त्यामुळेच टी २० संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने या गोष्टीचा उल्लेख केलाय. चहर सध्या मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिरामध्ये असून रात्री जेव्हा त्याला सिलेक्शनची बातमी समजली तेव्हा आधी त्याला विश्वासच बसला नाही. नंतर त्याचं अनेक सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं. व्हिडीओमध्ये चहर इथे पोहण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागल्याचं सांगतो. मी १९ वर्षांखालील विश्वचषकामध्ये खेळू शकतो नव्हतो. एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याच्या फार कमी संधी आयुष्यात मिळतात. त्यामुळे मी फार आनंदी आणि थोडा भावूक जालोय असं चहर सांगताना दिसतो.

नक्की वाचा >> T20 World Cup : टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा, एक दोन नाही तर तब्बल ६ खेळाडूंना मिळाली संधी

…म्हणून चहलऐवजी चहरला संधी

आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज अशी चहलची ओळख असताना त्यांच्या अनुभवाऐवजी मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळणाऱ्या चहरला निवड समितीने प्राधान्य दिलं आहे. अर्थात आता अनुभवी चहलपेक्षा चहरमध्ये असे कोणते गुण निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी पाहिले असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर याच प्रश्नाचं उत्तर भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर मुख्य निवड अधिकारी चेतन शर्मा यांनी दिलंय. निवड समितीची बैठक झाली तेव्हा निवड करणाऱ्यांपैकी अनेकांनी चहर हा चहलपेक्षा अधिक चांगला लेग स्पिनर म्हणून संघाला फायद्याचा ठरु शकतो असं मत पडल्याने हे सिलेक्शन करण्यात आल्याचं शर्मा म्हणाले. जास्त वेगाने चेंडू फेकणारा फिरकी गोलंदाज संघात हवा होता. त्यामुळेच चांगल्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या चहरला आम्ही संधी देण्याचा निर्णय़ घेतला. वेगाबरोबरच खेळपट्टीवर चांगली पकड बनवण्याची क्षमता असणारा फिरकी गोलंदाज असावा असं निवड समितीच्या अधिकाऱ्याचं मत होतं. आम्ही चहल आणि चहर या दोघांच्या नावाबद्दल फार जास्त विचार केला. मात्र शेवटी अनेकांनी चहरची निवड योग्य राहील असं मत व्यक्त केल्याने त्याला संधी देण्यात आल्याचं शर्मा म्हणाले.

नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज

दोघेही गेलेले श्रीलंकेच्या दौऱ्यावर…

राहुल चहर आणि युजवेंद्र चहल या दोघांना मागील महिन्यामध्ये झालेल्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर संधी देण्यात आलेली. या दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय सामने आणि ती टी २० सामने खेळवण्यात आलेले. चहलने एकदिवसीय मालिकेतील तिन्ही तर टी २० मधील दोन सामने खेळले होते. त्याने चांगली गोलंदाजी करत ५ बळी घेतले होते. चहलने टी २० मध्ये एक बळी घेतला तर चार बळी एकदिवसीय सामन्यांमध्ये घेतले. मात्र नंतर करोनाचा संसर्ग झाल्याने तो इतर सामने खेळू शकला नाही. दुसरीकडे राहुल चहरने २ टी २० आणि एक एकदिवसीय सामना खेळला. त्यात त्याने दोन टी २० मध्ये चार विकेट्स घेतल्या. एकमेव एकदिवसीय सामन्यामध्ये चहरने तीन विकेट्स घेतल्या होत्या. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

नक्की वाचा >> T20 World Cup: निवृत्तीनंतरही टीम इंडियामध्ये धोनीचं ‘सिलेक्शन’; ‘या’ निर्णयामागील रजनीकांत कनेक्शन माहितीय का?

अनुभव अधिक पण…

अनुभवाबद्दल बोलायचं झाल्यास चहलचं पारडं हे चहरपेक्षा अधिक जड आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये चहलची कामगिरी टी २० मध्ये फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. चहलने जून २०१६ मध्ये टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पुढील तीन वर्षांमध्ये त्याने फार छान कामगिरी केली. त्याने ३१ सामन्यांमध्ये २१.१३ च्या सरासरीने एकूण ४६ विकेट्स घेतल्या. यामध्ये एकदा त्याने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला. मात्र मागील दोन वर्षांमध्ये त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. सप्टेंहर २०१९ नंतर चहलने १८ टी २० सामन्यांमध्ये केवळ १७ विकेट्स घेतल्यात. या विकेट्स त्याने ३६.५८ व्या सरासरीने घेतल्यात. त्याच्या करियरची सरासरी ही २५.३० इतकीच आहे. त्यामुळेच चहलला यंदा संधी देण्यात आलेली नाही.

नक्की वाचा >> T20 World Cup: चार वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर अश्विनने पोस्ट केला घरातील भिंतींचा फोटो; म्हणाला…

दोघांची तुलना केल्यास…

३१ वर्षीय चहलच्या एकूण टी २० करियर बद्दल बोलायचं झालं तर त्याने २०७ सामन्यांमध्ये २४.६७ च्या सरासरीने २२७ विकेट्स घेतल्यात. त्याचा स्ट्राइक रेड १९.४० इतका आहे. म्हणजेच त्याने प्रत्येक १९ व्या चेंडूवर एक विकेट घेतलीय दुसरीकडे राहुल चहरने ६६ टी २० सामन्यांमध्ये ८२ विकेट्स घेतल्यात. त्याची सरासरी २१.३६ राहिली आहे. ही चहलच्या कामगिरीपेक्षा चांगील आहे. स्ट्राइक रेटच्या बाबतीतही चहर हा चहलपेक्षा सरस आहे. चहर प्रत्येक १७ व्या चेंडूवर विकेट घेतो.