scorecardresearch

Premium

WTC Final 2023: टीम इंडियाचा पराभव करण्यासाठी स्टीव्ह स्मिथने आखली ‘ही’ रणनिती, ‘तो’ Video व्हायरल

या व्हिडीओत स्मिथ वेगळ्या अंदाजात फलंदाजी करताना दिसत आहे. स्मिथचा फलंदाजीचा सराव करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

WTC FInal 2023 latest News
स्टीव्ह स्मिथचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झालाय. (Image-Instagram)

Steve Smith Practice With Diffrent Bat Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ७ जूनपासून इंग्डलच्या ओवल मैदानात होणार आहे. दोन्ही संघ इंग्लंडला पोहोचले आहेत आणि या सामन्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान कांगारु टीमचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत स्मिथ वेगळ्या अंदाजात फलंदाजी करताना दिसत आहे. स्मिथचा फलंदाजीचा सराव करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध होणारा हा सामना जिंकायचा असेल, तर स्टीव्ह स्मिथला मोठ्या जबाबदारीनं खेळावं लागेल आणि यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. आयसीसीने स्मिथचा फलंदाजीचा सराव करत असल्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत स्मिथ वेगळ्या स्टाईलच्या बॅटने फलंदाजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, जेव्हा स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीवर असेल, तेव्हा काहीतरी मनोरंजन करेल, याची अपेक्षा ठेऊयात.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

नक्की वाचा – WTC फायनलमध्ये ‘यशस्वी’ होण्यासाठी जैस्वालने घेतल्या ‘विराट’ टिप्स, सरावादरम्यान दाखवला फलंदाजीचा जलवा, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (२०२१-२३) दुसऱ्या सत्रात स्टीव्ह स्मिथची कामगिरी आतापर्यंत खूप चांगली झाली आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या १९ सामन्यांपैकी ३० इनिंगमध्ये त्याने ५०.०८ च्या सरासरीनं १२५२ धावा केल्या आहेत. तसंच स्मिथने तीन शतक आणि सहा अर्धशतक ठोकण्याची अप्रतिम कामगिरीही केली आहे. त्याने २०० धावांची नाबाद खेळी केल्याने त्याचा हा बेस्ट स्कोअर ठरला आहे. स्टीव्ह स्मिथने या फायनलबाबत प्रतिक्रिया देत म्हटलंय, आमच्यासाठी अव्वल स्थानावर राहूनन क्वालिफाय करणं आणि फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना करणं, खूप रोमांचक आहे. हा सामना पाहायला खूप प्रेक्षक जमतील, याचा मला विश्वास आहे. टीम इंडियाचे समर्थक जास्त असतील. हा एक जबरदस्त सामना होईल, असं मला वाटतं. दोन्ही संघाच्या खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Watch steve smith sets a new plan to defeat team india in wtc final 2023 steve smith practice with different bat video viral nss

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×