Team India’s warm welcome after victory: आशिया कपमध्ये भारतीय संघाने सोमवारी पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. कोलंबोमध्ये खेळला गेलेला सामना पहिल्या दिवशी पावसामुळे राखीव दिवसापर्यंत पोहोचला, जिथे भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी आणि नंतर शानदार गोलंदाजी करत ऐतिहासिक विजय नोंदवला. जेव्हा विजय इतका खास असतो तेव्हा त्याचा उत्सवही तितकाच खास बनतो.

टीम इंडियाने स्विमिंग पूलमध्ये केली पार्टी –

बीसीसीआयने चाहत्यांसाठी टीम इंडियाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सामन्याच्या सुरुवातीपासून ते खेळाडूंच्या रिकव्हरीपर्यंत सर्व काही दाखवण्यात आले होते. सामना संपल्यानंतर खेळाडू हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. हॉटेलचे अधिकारी टाळ्या वाजवताना दिसले. ताजेतवाने झाल्यावर सर्व खेळाडू पूलमध्ये पोहोचले. विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि रोहित शर्मा पूलमध्ये डान्स करताना दिसले. शुबमन गिलही सीनियर खेळाडूंमध्ये मस्ती करताना दिसला.

विराट कोहलीने केक कापला –

या सामन्यात विराट कोहलीने १२२ धावा केल्या होत्या. या खेळाडूने केवळ ९४ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकार ठोकले. या खास खेळीसाठी कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला केक कापायला लावला. केक पाहून कोहली खूश झाला. त्याने केक खाऊन सर्वांचे आभार मानले.

हेही वाचा – IND vs PAK: हार्दिक पांड्याने बाबर आझमला केले बोल्ड; पाकिस्तानचा कर्णधार भारताविरुद्ध पुन्हा अपयशी, पाहा VIDEO

भारताचा श्रीलंकेशी होणार सामना –

भारतीय संघाचा सुपरफोर मधील हा पहिला विजय ठरला. तो दोन गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. २२८ धावांच्या विजयासह त्यांचा निव्वळ रन रेट +४.५६० वर पोहोचला आहे. आता त्याचा पुढील सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. तसेच टीम इंडिया शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरेल.

हेही वाचा – IND vs PAK: भारताचा वनडेतील सर्वात मोठा विजय! पाकिस्तानचा २२८ धावांनी उडवला धुव्वा, कोहली-राहुलनंतर कुलदीपने केली कमाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने पाकिस्तानविरुद्ध नोदंवला ऐतिहासिक विजय –

भारताने २४.१ षटकात १४७ धावा केल्या होत्या. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने ५० षटकांत ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला ३२षटकांत आठ गडी गमावून केवळ १२८ धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाने २२८ धावांनी विजय मिळवला.