महेंद्रसिंह धोनी हा आपल्या कर्णधारपदाच्या काळात ‘कॅप्टन कूल’ या नावाने ओळखला जायचा. कोणत्याही खडतर प्रसंगात शांत राहून संघाला हाताळण्याचं कसब महेंद्रसिंह धोनीकडे होतं. कित्येकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही धोनीचा हा ‘कूल’ अंदाज आपण पाहिला असेल. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या एका सामन्यात महेंद्रसिंह धोनीने पाकिस्तानी फलंदाज उमर अकमलला बाद करण्यासाठी आपल्या संघातील खेळाडू सुरेश रैनाला स्लेजिंग करण्यासाठी भाग पाडलं होतं. खुद्द सुरेश रैनानं ‘Breakfast with Champions’ या कार्यक्रमात ही कबुली दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु होता आणि उमर अकमल फलंदाजी करत होता. यावेळी रैना मला चिथवण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार उमरने धोनीजवळ केली. यावेळी धोनीने माझ्याकडे बघितल्यानंतर आपण त्याला चिथवत नसल्याचं मी लगेच स्पष्ट केलं. चेंडू धोनीकडे थ्रो करत असताना मी उमर अकमलला जरा वेगाने धावा काढ, असं म्हणालो.” हे ऐकल्यानंतर धोनीने मला उमर अकमलकडे पाहून आणखी स्लेजिंग करण्याचा सल्ला दिला. निवेदक गौरव कपूरशी बोलताना रैनाने धोनीची आठवण सांगितली.

धोनीला सामन्याच्या परिस्थितीचा बरोबर अंदाज यायचा. ज्यावेळी त्याने मला अकमलकडे पाहून स्लेजिंग करायला सांगितलं, त्यावेळी त्याला अंदाज आला होता की दडपणाखाली येऊन अकमल आपली विकेट फेकेल. पुढे काय होणार आहे आणि आपण आता कोणतं पाऊल उचललं पाहिजे याची कर्णधार म्हणून धोनीला चांगली जाण होती. मैदानात उतरताना धोनीकडे कर्णधार म्हणून A,B आणि C असे ३ प्लान तयार असायचे. परिस्थितीनुसार धोनी आपल्या प्लानप्रमाणे वागायचा. सुरेश रैना, गौरव कपूरशी गप्पा मारताना बोलत होता.

आतापर्यंत धोनी, रैना आणि अकमल संघात खेळत असताना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात १२ सामने (वन-डे आणि टी-२०) झाले आहेत. त्यामुळे सुरेश रैनाने या कार्यक्रमात नेमक्या कोणत्या सामन्याचा उल्लेख केला आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये.

अवश्य वाचा – ……म्हणून धोनीने ‘ती’ शेवटची ओव्हर जोगिंदर शर्माला सोपवली

सध्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु असल्याने धोनी विश्रांती घेतो आहे. श्रीलंकेविरुद्ध आगामी वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये धोनीचं पुन्हा एकदा संघात पुनरागमन होईल. मात्र दुसरीकडे गेले काही महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या सुरेश रैनाला भारतीय संघात जागा मिळते का याबाबत काहीच खात्री देता येत नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch video how ms dhoni insist suresh raina to sledge against umar akmal
First published on: 26-11-2017 at 13:50 IST