भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड होण्याचा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सोमवारी केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुली BCCI चे अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

गांगुली BCCI अध्यक्षपदी यशस्वी ठरेल?, सचिन म्हणतो…

२३ ऑक्टोबरला BCCI च्या सर्वसाधारण सभेत नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या संदर्भात सौरव गांगुलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकाराने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याबद्दल गांगुलीला प्रश्न विचारला, त्यावेळी गांगुलीने मजेदार उत्तर दिले. गांगुली पत्रकारांशी संवाद साधत असताना ‘तुम्ही रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केलीत का?’ असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर ‘आता त्यांनी काय केलं?’ असं मजेदार उत्तर गांगुलीने पत्रकाराला दिले. त्या उत्तरानंतर काही काळ पत्रकारांमध्येही हशा पिकला.

‘त्या’ चुकीबद्दल सेहवागने मागितली कुंबळेची माफी

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाच्या निवडीसाठी सचिन तेंडुलकर, व्ही व्ही एस लक्ष्मण आणि सौरव गांगुली या तिघांच्या समितीची नियुक्ती BCCI ने केली होती. त्यात रवी शास्त्री यांच्या मुलाखतीसाठी गांगुली गैरहजर होता. त्यावेळी गांगुलीला रवी शास्त्री यांची निवड होऊ द्यायची नव्हती म्हणून तो गैरहजर राहिला अशा चर्चा रंगल्या होत्या. रवी शास्त्री यांनीही तशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती. त्यावरही गांगुलीने उत्तर दिले. “रवी शास्त्री यांना नाकारून अनिल कुंबळेंची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी निवड करण्यामागे माझा हात होता असे जर शास्त्रींना वाटत असेल तर ते मुर्खांच्या राज्यात जगत आहेत”, असेही गांगुली म्हणाला.

“आता ICC च्या स्पर्धा जिंकण्यावर लक्ष द्या”; गांगुलीचा विराटला सूचक सल्ला

दरम्यान, गांगुलीच्या नेतृत्वाखालील BCCI च्या पदाधिकाऱ्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांची सचिवपदी, तर भाजपा नेते अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण सिंग धुमाळ यांची खजिनदारपदी आणि निवड होणेही जवळपास निश्चित आहे.