Sarfaraz Khan on BCCI: सध्या क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये सरफराज खानची बरीच चर्चा आहे, त्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सरफराज खानची टीम इंडियामध्ये निवड झालेली नाही. एकीकडे अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी सरफराजची निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, तर दुसरीकडे हा खेळाडूही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला राग काढत आहे आणि आता खान स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

सौरव गांगुलीनेही सरफराज खानला पाठिंबा दिला आहे

सरफराज खानच्या नावावर देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत, तसेच तो प्रत्येक हंगामात केवळ शतकेचं झळकावत आहे. मात्र, एवढी शानदार कामगिरी करूनही तो टीम इंडियात एंट्री करू शकला नाही. खुद्द आता दादांनी म्हणजेच सौरव गांगुलीनेही या खेळाडूला उघड पाठिंबा दिला देत आपलं मत मांडलं आहे. गांगुली म्हणाला की, “सरफराज खानसाठी मला खूप वाईट वाटत आहे कारण गेल्या ३ वर्षांत खानने ज्या प्रकारे धावा केल्या आहेत, त्या तरुण फलंदाजाला संधी मिळायला हवी होती. एकदम अकरा नाही पण किमान संघासोबत तरी असायला हवा होता.

सरफराज खान स्वत:ला आनंदी दिसण्याचा प्रयत्न करत आहे

सरफराज खान प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत इन्स्टावर शेअर करतो. आजकाल इन्स्टा स्टोरीवर सतत सरावाचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत.  आता सरफराजने इन्स्टावर स्वतःचा एक मस्त फोटो पोस्ट केला आहे. या छायाचित्रात हा खेळाडू एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. त्याने एक प्रकारे यातून बीसीसीआयला एक संदेश दिला आहे.

सोशल मीडियावर सरफराज खानचे नवीन छायाचित्र

सरफराजने जो नवीन फोटो शेअर केला आहे त्यात तो हिरो पेक्षा कमी दिसत नाही आहे. यातून तो खुश असून एकप्रकारे चाहत्यांना सांगत आहे की मी किती सुंदर दिसतो. तसेच, त्याच्या शरीरयष्टीवरून त्याची संघात निवड झाली नव्हती यावरून बीसीसीआय मी किती फिट आहे हे दर्शवत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या वागण्याची पद्धतीवर देखील टीका करण्यात आली होती. त्यातून मी किती कूल आहे सांगत आहे. हा फलंदाज स्वतःचे रेकॉर्ड देखील पोस्ट करतो आहे.

हेही वाचा: Ajinkya Rahane: “अरे भाऊ कुठे येऊन फसलो…” भारताचा खेळाडू रहाणेने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली; पाहा video

टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा कधी सुरू होईल?

टीम इंडियाने डब्ल्यूटीसी फायनलपासून क्रिकेट खेळलेले नाही आणि टीमला दीर्घ ब्रेक मिळाला आहे, जो संपणार आहे. आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्याला जुलै महिन्यात सुरुवात होणार असून पहिली कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर वन डे आणि टी२० मालिका होणार आहेत.