लिस्बन : फुटबॉलमध्ये नियमभंगासाठी आतापर्यंत पंच पिवळे आणि लाल कार्ड वापरतात हे सर्वश्रुत होते. मात्र पंचांकडे एक पांढरे कार्डही असते, याची फार कोणाला कल्पना नाही. पंचांनी या पांढऱ्या कार्डचा वापर फुटबॉलमध्ये प्रथमच शनिवारी पोर्तुगाल येथील एका स्थानिक सामन्यात केला.पोर्तुगालमधील महिला फुटबॉल लीगमधील बेन्फिका विरुद्ध स्पोर्टिग लिस्बन या सामन्यात पंचांनी या पांढऱ्या कार्डचा वापर केला. फुटबॉलमध्ये कार्ड दाखवण्याची परंपरा १९७०च्या विश्वचषक स्पर्धेपासून सुरू झाली. परंतु पंचांनी पांढरे कार्ड वापरण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या महिला चषक स्पर्धेत शनिवारी पूर्वार्धाच्या अखेरीस हा प्रसंग घडला. स्टेडियममधील पहिल्या रांगेतील व्यक्तीला काही त्रास जाणवू लागल्याचे पंचांना जाणवले. मग दोन्ही संघातील डॉक्टरांनी खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवताना पंचांच्या आदेशानंतर तातडीने स्टेडियममधील त्या अस्वस्थ चाहत्याच्या मदतीसाठी धाव घेतली. त्या वेळी पंचांनी दोन्ही संघांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पांढरे कार्ड दाखवत त्यांच्या कृतीचे कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पांढऱ्या कार्डचा उद्देश काय?
खेळातील नैतिक मूल्य सुधारण्यासाठी आणि खिलाडूवृत्तीचे कौतुक करण्यासाठी सामन्यादरम्यान पंचांकडून पांढऱ्या कार्डचा वापर केला जातो. फुटबॉलची शिखर संघटना मानल्या जाणाऱ्या ‘फिफा’नेच हे पांढरे कार्ड सादर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ‘कन्कशन’चा पर्यायही ‘फिफा’ने मान्य केला आहे.