Man Of The Match Awardees In Asia Cup Finals: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघ तब्बल ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया चषकातील अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी सुपर ४ फेरीत बांगलादेशला पराभूत करून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केलं. याआधी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता अंतिम सामना जिंकून भारतीय संघ विजयाची हॅट्रीक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्याआधी जाणून घ्या कोण आहेत आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू. पाहा संपूर्ण यादी

कोण आहेत आशिया चषकातील अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

सुरींदर खन्ना- १९८४

आशिया चषक स्पर्धा पहिल्यांदा १९८४ मध्ये खेळवली गेली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे ३ संघ आमनेसामने आले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला होता. भारतीय संघाकडून अंतिम सामन्यात सुरींदर खन्ना यांनी ५६ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर ते सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.

जावेद मियांदाद- १९८६

आशिया चषक १९८६ स्पर्धेवर भारतीय संघाने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेचा भाग नव्हता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली होती. तर जावेद मियांदाद यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.

नवज्योतसिंग सिद्धू-१९८८
आशिया चषक १९८८ मध्ये झालेल्या स्पर्धेत भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला होता. तर ७६ धावा करणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी ७६ धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

मोहम्मद अजहरुद्दीन- १९९१
आशिया चषक १९९१ मध्ये भारतीय संघाने भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून पुन्हा एकदा जेतेपदाचा मान पटकावला होता. या सामन्यात मोहम्मद अजहरूद्दीन यांनी नाबाद ५४ धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

मोहम्मद अजहरूद्दीन- १९९५
आशिया चषक १९९५ स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा श्रीलंकेला पराभूत करत जेतेपदाचा मान पटकावला होता. या सामन्यात मोहम्मद अजहरूद्दीन यांनी नाबाद ९० खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

मार्वन अटापटू- १९९७
आशिया चषक १९९७ मध्ये पुन्हा एकदा भारत- श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने होते. मात्र यावेळी श्रीलंकेने बाजी मारली. श्रीलंकेकडून मार्वन अटापटूने नाबाद ८४ धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

मोईन खान- २०००
आशिया चषक २००० मध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मोईन खानने ५६ धावांची खेळी केली होती. यासह तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

मार्वन अटापटू- २००४
आशिया चषक २००४ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली होती. ६५ धावांची खेळी करणाऱ्या मार्वन अटापटूने सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

अजंता मेंडिस- २००८
आशिया चषक २००७ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. हा सामना श्रीलंकेने जिंकला होता. या सामन्यात अजंता मेंडिसने १३ धावा खर्च करून ६ गडी बाद केले होते. यासह सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

दिनेश कार्तिक- २०१०
आशिया चषक २०२० स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. या सामन्या दिनेश कार्तिकने ६६ धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने जिंकला होता. तर दिनेश कार्तिक सामनावीराचा मानकरी ठरला होता.

शाहिद आफ्रिदी- २०१२
या हंगामातील अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होता. या सामन्यात शाहिद आफ्रिदीने फलंदाजी करताना ३२ धावा आणि गोलंदाजीत १ गडी बाद केला होता. या खेळीच्या बळावर त्याने सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

लसिथ मलिंगा- २०१४
आशिया चषक २०१४ स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं. या सामन्यात मलिंगाने ५६ धावा करून ५ गडी बाद केले होते.

शिखर धवन- २०१६
या हंगामातील अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला होता. या सामन्यात शिखर धवनने ६० धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

लिटन दास- २०१८
या हंगामातही भारत- बांगलादेश अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. या सामन्यात लिटन दासने १२१ धावांची खेळी करून सामनावीर पुरस्कार पटकावला होता. पण सामना भारतीय संघाने जिंकला होता.

भानुका राजपक्षा- २०२२
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भानुका राजपक्षाने नाबाद ७१ धावा करून सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

मोहम्मद सिराज- २०२३
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात मोहम्मद सिराजने २१ धावा खर्च करून ६ गडी बाद केले होते. यासह सामनावीर पुरस्कार पटकावला होता.