Devajit Saikia is the new secretary of BCCI : माजी यष्टीरक्षक फलंदाज देवजीत सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सचिवपदी अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांच्या जागी सैकिया हे पद स्वीकारतील. सैकिया हे बीसीसीआयचे सचिव बनणे निश्चित मानले जात होते. कारण ते या पदासाठी एकमेव उमेदवार होते. सैकिया यांची सचिवपदी निवड करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत (SGM) घेण्यात आला.

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर सैकिया हे बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून काम करत होते. बीसीसीआयच्या घटनेनुसार, कोणतेही रिक्त पद ४५ दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलावून भरावे लागते. जय शाह यांनी १ डिसेंबर २०२४ रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आणि बीसीसीआयने पद रिक्त झाल्यानंतर ४३ व्या दिवशी बैठक बोलावली.

कोण आहे देवजीत सैकिया?

देवजीत सैकिया हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असून त्यांनी १९९० ते १९९१ पर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यांची क्रिकेट कारकीर्द खूपच लहान राहिली आणि या काळात त्यांनी ५३ धावा केल्या आहेत. त्यांनी विकेटच्या मागे नऊ विकेट्स घेतल्या. क्रिकेटनंतर त्यांनी लॉमध्ये करिअर केले आणि वयाच्या २८ व्या वर्षी ते गुवाहाटी उच्च न्यायालयात वकील झाले. त्याच वेळी, स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत, त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि उत्तर रेल्वेमध्ये नोकरी मिळाली.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा मेलबर्न कसोटीनंतर घेणार होता निवृत्ती; कोणामुळे बदलला निर्णय? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवजीत सैकियांची क्रिकेट प्रशासनातील कारकीर्द २०१६ मध्ये सुरू झाली, जेव्हा ते आसाम क्रिकेट असोसिएशन (एसीए) च्या सहा उपाध्यक्षांपैकी एक बनला, ज्याचे अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा होते. जे सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत. सैकिया २०१९ मध्ये एसीएचे सचिव झाले. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांची बीसीसीआयचे संयुक्त सचिव म्हणून निवड झाली.