Who Is Narayan Jagadeesan : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेतील पाचव्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील उपकर्णधार आणि मुख्य यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. मालिकेतील चारही सामन्यात त्याने दमदार फलंदाजी केली. पण तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याच्या हाताच्या बोटाला आणि चौथ्या कसोटीत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तो फलंदाजीला तर आला, पण यष्टीरक्षण करण्यासाठी मैदानात येऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी नारायण जगदीशनला संघात संधी देण्यात आली आहे. दरम्यान नारायण जगदीशन आहे तरी कोण? जाणून घ्या.

मालिकेतील चौथ्या सामन्याचा निकाल लागताच बीसीसीआयने पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करत असल्याची घोषणा केली. पाचव्या कसोटीसाठी ऋषभ पंतच्या जागी नारायण जगदीशनची निवड करत असल्याची घोषणा केली.

नारायण जगदीशन आहे तरी कोण?

नारायण जगदीशन हा यष्टीरक्षक फलंदाज असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू संघाकडून खेळतो. तो लवकरच भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. नारायण जगदीशनला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५२ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला ३३७३ धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्याने ४७.५० च्या सरासरीने फलंदाजी करताना १० शतकं आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत.

आता ध्रुव जुरेल आणि नारायण जगदीशन या दोघांमध्ये प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने ८ सामन्यांमध्ये ६७४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याला २ शतकं आणि ५ अर्धशतक झळकावण्यात यश आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नारायण जगदीशनला आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या २ संघांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या स्पर्धेतील १३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याला ७३ धावा करता आल्या आहेत. ऋषभ पंतची जागा घेण्यासाठी इशान किशनला भारतीय संघात स्थान दिलं जाणार होतं. पण तो दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.