Shikhar Dhawan Video Viral on Social Media : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. व्हिडीओ आणि फोटो शेअर करून तो त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा तसेच त्यांच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, आता शिखर धवनने असा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहिल्यानंतर यूजर्स हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये त्याने लग्नाबाबत एक आश्चर्यकारक गोष्ट लोकांना सांगितली आहे. त्याचवेळी आता शिखर धवनचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

वास्तविक, शिखर धवन सोशल मीडियावर सतत रील बनवत असतो. तो अनेकदा त्याचे फनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान, मंगळवारी त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. यात तो प्रथम म्हणतो, “अनेक लोक लग्न करत नाहीत. कारण त्यांच्या पत्नी त्यांना मारतात.”

viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल
MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Devon Conway Out Of IPL 2024
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर

यानंतर तो हसतो आणि मग म्हणतो, “अरे वेड्यांनो, ती रोज थोडीच मारते.” शेवटी शिखर धवन बोटे चावू लागतो. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. हे शेअर करताना शिखर धवनने कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा तुम्ही गंभीरपणे मजेदार असू शकता, तेव्हा गंभीर का व्हा.”

हेही वाचा – Praveen Kumar : “ते खूप जास्त करायचे…”, ‘बॉल टॅम्परिंग’बाबत माजी भारतीय गोलंदाजाचे वक्तव्य

उल्लेखनीय म्हणजे शिखर धवन गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. शिखर धवन आणि ‘किक बॉक्सर’ आयेशा मुखर्जी २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले होते. यानंतर दोघेही अनेक वर्षे एकमेकांसोबत राहत होते. पण सप्टेंबर २०२१ मध्ये शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांनी ते एकमेकांपासून वेगळे होत असल्याची माहिती दिली. यानंतर मार्च २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. मात्र, त्यानंतरही शिखर धवन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला.

हेही वाचा – IND vs AFG 1st T20: मोहालीतील धुक्यामुळे भारत-अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना रद्द होण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज

उल्लेखनीय आहे की धवनने डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि तो पुन्हा संघात परतला नाही. सध्या टीम इंडियामध्ये सलामीच्या फलंदाजांसाठी अनेक पर्याय आहेत, जे चांगली कामगिरी करत आहे.
शिखर धवन आयपीएल २०२३ मध्ये शेवटचा क्रिकेट खेळताना दिसला होता, ज्यामध्ये त्याने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले होते. मात्र, त्यातही तो दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. पंजाबने त्याला आयपीएल २०२४ साठी कायम ठेवले असून धवनने १७ व्या हंगामाची तयारी सुरू केली आहे. अलीकडेच, त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये धवन पंजाबची किट परिधान करून नेटमध्ये फलंदाजी करताना दिसत होता.