Shikhar Dhawan on Ind-Pak game in World Cup: भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाचा भाग राहिलेला आहे आणि त्याने अनेक प्रसंगी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना केला आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढील काही महिन्यांत किमान ३-४ वेळा पाकिस्तानचा सामना करणार आहे. अशा परिस्थितीत धवनने आशिया कप २०२३ मध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल मोठे विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिया चषक २०२३ या स्पर्धेचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पण त्यांनी हा व्हिडीओ लगेच काढून टाकला. व्हिडीओमध्ये धवनने एक विचित्र विधान केले आहे. तो म्हणाला की, “वर्ल्ड कप जिंका किंवा जिंकू नका पण पाकिस्तानविरुद्ध नक्कीच जिंकू” असे म्हटले आहे. धवनच्या या व्हिडीओनंतर चाहते संतापताना दिसत आहेत. वाढता वाद पाहून स्टार स्पोर्ट्सने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून लगेच डिलीट केला.

आशिया चषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी स्पर्धा करतील, तर विश्वचषक २०२३ मध्ये, दोन्ही संघ १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. धवन व्हिडिओमध्ये म्हणाला, वर्ल्ड कप जिंको की न जिंको पण पाकिस्तानविरुद्ध नक्कीच हरवू. “तुम्ही विश्वचषक जिंकलात काय किंवा नाही जिंकलात पण पाकिस्तानला मात्र नक्कीच हरवा,” असे हसत हसत तो म्हणाला. तो पुढे म्हणाला की, “मात्र विश्वचषक जिंकणेही महत्त्वाचे आहे आणि देवाच्या कृपेने आम्ही जिंकू, अशी आशा आहे. उत्साह नक्कीच आहे पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दडपणही खूप असते. सामन्याच्या शेवटी त्यांच्याविरुद्ध खेळणे ही निश्चितच समाधानाची भावना आहे. मी जेव्हा-जेव्हा पाकिस्तानशी खेळलो आहे, तेव्हा बहुतेक आम्ही जिंकलो आहोत. मैदानावरील आक्रमकता आणि जोश हा त्यावेळी खूप जास्त असतो, त्यात त्यांच्याशी काही हलकेफुलके संवादही झाले आहेत.”

हेही वाचा: IND vs WI 3rd T20: टीम इंडियाची नाचक्की आता हार्दिक पांड्याच्या हाती, तिसरा सामना हरल्यास ओढवेल ‘ही’ नामुष्की!

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारतात होणाऱ्या आयसीसी वन डे विश्वचषकात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानच्या सहभागाची पुष्टी केली. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “खेळांना राजकारणात मिसळू नये, असे पाकिस्तानने सातत्याने सांगितले आहे. त्यामुळे आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी आपला क्रिकेट संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.”

आशिया कप २०२३ पूर्ण वेळापत्रक

३० ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान

३१ ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी

२ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – कॅंडी

३ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर

४ सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी

५ सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर

हेही वाचा: Jos Buttler: इंग्लंडमधील ‘द हंड्रेड टूर्नामेंट’मध्ये बटलरला केलेले रन आउट वादाच्या भोवऱ्यात, सोशल मीडियावर Video व्हायरल

सुपर-४

६ सप्टेंबर – A1 वि B2 – लाहोर

९ सप्टेंबर – B1 वि B2 – कोलंबो

१० सप्टेंबर – A1 वि A2 – कोलंबो

१२ सप्टेंबर – A2 वि B1 – कोलंबो

१४ सप्टेंबर – A1 वि B1 – कोलंबो

१५ सप्टेंबर – A2 विरुद्ध B2 – कोलंबो

१७ सप्टेंबर – अंतिम – कोलंबो

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Win the world cup or not but win against pakistan shikhar dhawan gave a statement avw
First published on: 08-08-2023 at 15:19 IST