Najam Sethi on World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) यांच्यात आशिया चषक २०२३ च्या स्थळाबाबत चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानने केले असून बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाण्याची परवानगी नाकारली आहे. यानंतर ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने एक हायब्रीड मॉडेल सादर केले होते ज्यामध्ये भारताला आपले सामने तटस्थ ठिकाणी खेळावे लागतील आणि इतर सर्व सामने पाकिस्तानमध्ये होतील. मात्र नुकताच यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. हे हायब्रीड मॉडेल पाकिस्तानने ICC मध्ये सादर केल्याचे वृत्त होते, ज्यामध्ये पाकिस्तानी संघ २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाचे सामने भारताऐवजी पाकिस्तानमध्ये खेळेल.

पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) स्पष्ट उत्तर दिले आहे. पीसीबीने हे हायब्रीड मॉडेल आयसीसीमध्ये सादर केल्याचे पूर्णपणे नाकारले आहे. पीसीबीने शुक्रवारी स्पष्ट केले की त्यांचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत कधीही हे मत मांडले नाही की त्यांचा पुरुष संघ भारताऐवजी बांगलादेशमध्ये त्यांचे विश्वचषक सामने खेळण्यास उत्सुक आहे. तथापि, पीटीआयने २९ मार्च रोजीच असे वृत्त दिले होते की आयसीसीने आपल्या व्यासपीठावर अशी कोणतीही चर्चा कधीही झाली नसल्याचा इन्कार केला होता.

Russia China friendship, India, in new Cold War, usa, Foreign Relations, india Russia realtions, india china relations, india America relation, trade,
रशिया-चीन मैत्री घट्ट होणे भारतासाठी किती चिंताजनक? नवीन शीतयुद्ध विभागणीत भारताचे स्थान काय?
ipl 2024 livingstone returns to england
गुडघ्याच्या दुखापतीमुळे लिव्हिंगस्टोन मायदेशी ; बटलर, जॅक्स, टॉपलीही इंग्लंडला परत
Afghanistan Fan Misbehaves With Shaheen Afridi Video Viral
IRE vs PAK 2nd T20I : अफगाणिस्तानच्या चाहत्याने शाहीन आफ्रिदीशी केले गैरवर्तन, VIDEO होतोय व्हायरल
Autobiography of Ajay Bisaria Ambassador of India to Pakistan History of India Pakistan Relations
भारतीयाने इस्लामाबादेतून पाहिलेला भारत..
Ali's Challenge for Three Sixes in a straight
Babar Azam : ‘जर बाबरने टी-विश्वचषकात समोर सलग ३ षटकार मारले तर…’, माजी क्रिकेटपटूने कर्णधाराला दिलं खुलं आव्हान
All India Matches in Lahore for ICC Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : पाकिस्तानने जाहीर केले ठिकाण, भारतीय संघाचे सगळे सामने ‘या’ शहरात होणार
Pakistan Cricket Board Appoint Gary Kirsten as T20 Format Coach T20 World Cup 2024
T20 WC पूर्वी, पाकिस्तानची मोठी खेळी; भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या दिग्गजाची मुख्य प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती
Indian domestic cricketer salary
BCCI : भारताचे देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपेक्षा मिळणार जास्त मानधन

काय म्हणाले नजम सेठी?

आयसीसीने म्हटले होते की, “बांगलादेश कोणत्याही विश्वचषक सामन्याचे यजमानपदाचा दावेदार नाही कारण बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट बोर्ड) आश्वासन दिले होते की पाकिस्तान संघासाठी व्हिसाची कोणतीही समस्या होणार नाही.” पीसीबीने स्पष्ट केले की या स्पर्धेची ‘हायब्रीड मॉडेल’ ही संकल्पना केवळ आशिया चषक स्पर्धेशी संबंधित आहे कारण भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. दुसरीकडे, पीसीबीचे अध्यक्षपद भूषवत असलेले नजम सेठी यांनी गुरुवारी रावळपिंडी/इस्लामाबाद येथे प्रसारमाध्यमांशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देताना सांगितले की, “आशिया चषक स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या ‘हायब्रीड मॉडेल’बाबत त्यांनी मीडियाला माहिती दिली होती. जेणेकरून टीम इंडियाच्या पाकिस्तानात न येण्याच्या निर्णयानंतर निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येईल.”

आता पीसीबीने स्पष्ट विधान जारी केले आहे

पीसीबीने जारी केलेल्या नवीन निवेदनानुसार, भारताचे सामने तटस्थ ठिकाणी आणि उर्वरित पाकिस्तानमध्ये खेळवण्याच्या प्रस्तावावर एसीसीमध्ये चर्चा सुरू आहे. त्याच प्रेसरिलीझमध्ये नजम सेठी यांचे म्हणणे उद्धृत केले गेले की मीडियाच्या एका भागाने त्यांचा दृष्टिकोन चुकीचा मांडला आहे. गुरुवारच्या पत्रकार परिषदेत कोणत्याही टप्प्यावर नजम सेठी यांनी ऑक्टोबरमध्ये भारतात होणार्‍या आयसीसी किंवा पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ वर भाष्य केले नाही. या प्रकरणावर आतापर्यंत आयसीसीच्या कोणत्याही मंचावर चर्चा झालेली नाही.

हेही वाचा: IPL 2023: स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियात असून देखील स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओत कसा? काय होलोग्राम टेक्नॉलॉजी?

त्याच्या प्रकाशनात, पीसीबीने एका स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि लिहिले की, “पीसीबी निराश आहे की एका आघाडीच्या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राने चुकीचे माहिती दिली आहे, चुकीचा अर्थ लावला आहे. पीसीबीने क्रिकेटचे ‘हायब्रिड मॉडेल’ सादर केले आहे आणि त्यावर चर्चा केली आहे. आयसीसी तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आहे. या गोंधळात पडल्यानंतर पीसीबीने प्रसिद्धीपत्रकात नमूद करून सर्वांना दिलासा दिला की ‘हायब्रीड मॉडेल’च्या संकल्पनेवर नंतर चर्चा होऊ शकते. तथापि, अशी कोणतीही शिफारस नाकारली जाईल हे ICC मधील सर्वांना माहीत आहे. त्याचवेळी ‘हायब्रीड मॉडेल’चा पुरस्कार केला जाणार नाही, असे म्हणणेही चुकीचे ठरेल. योग्य वेळी हा मुद्दा आयसीसीकडे मांडला जाईल.