India vs Sri Lanka, World Cup 2023: भारतीय संघ विश्वचषकातील त्यांचा सातवा सामना शेजारील देश श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गुरुवारी (२ नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मुंबईत पोहोचली आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माने एक फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरी म्हणून शेअर केला आहे. हे पाहून टीम इंडियाचे चाहतेही नाराज झाले आहेत. वास्तविक, भारतीय कर्णधाराने शेअर केलेल्या छायाचित्रात धुके दिसत आहे.

रोहित शर्माने विमानातून प्रवास करताना वरून हे छायाचित्र काढले आहे. त्याने लिहिले, ‘मुंबईत हे काय झाले?’ गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवामान चिंतेचे कारण बनले आहे. प्रदूषणामुळे लोक हैराण झाले आहेत. रोहित शर्मापूर्वी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटनेही चिंता व्यक्त केली होती.

वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे

गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील हवामान चिंतेचा विषय आहे. ‘सीपीसीबी’च्या मते, मंगळवारी सकाळी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १६१ वर होता, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. सर्वात खराब हवेची गुणवत्ता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागात नोंदवण्यात आली जिथे AQI पातळी २५७ वर पोहोचली. त्यानंतर सायन जिथे AQI २१८, वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसर (१९८) आणि कुलाब्यातील नेव्ही नगर (१८९) मध्ये नोंदवले गेले.

हेही वाचा: PAK vs BAN: शाहीन आफ्रिदीने रचला इतिहास! वन डे क्रिकेटमध्ये घेतल्या सर्वात जलद १०० विकेट्स, शमी-बुमराहलाही टाकले मागे

काय म्हणाला होता जो रूट?

या विश्वचषकात मुंबईच्या खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आश्चर्यचकित झालेला रोहित हा पहिला क्रिकेटर नाही. इंग्लंडच्या सामन्यांदरम्यान जो रूटनेही याबाबत तक्रार केली होती. तो म्हणाला, “मी याआधी कधीच अशा हवामानात खेळलो नाही. मी साहजिकच जास्त उष्ण वातावरणात आणि कदाचित जास्त दमट परिस्थितीत खेळलो आहे, पण तुम्हाला श्वास घेता येत नाही, असे कधी जाणवले नाही. ही माझी पहिलीच वेळ आहे, जिथे मला हा त्रास जाणवत आहे.”

या विश्वचषकात भारत अजिंक्य आहे

मुंबईचा सध्याचा हंगाम खरोखरच चिंतेचा विषय बनवणारा आहे. रोहितसारखा खेळाडू या परिस्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहे. त्याने आपले सर्व क्रिकेट येथेच खेळले आहे. मात्र, विश्वचषकातील भारताच्या विजयात हवामान किंवा इतर कशाचाही अडथला येणार नाही, अशी आशा भारतीय कर्णधाराला वाटत आहे.

हेही वाचा: PAK vs BAN: शाहीन आफ्रिदी- मोहम्मद वसीमची भेदक गोलंदाजी! बांगलादेशने पाकिस्तानसमोर ठेवले २०५ धावांचे माफक आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने या स्पर्धेत सहा पैकी सहा सामने जिंकले आहेत आणि आतापर्यंत अपराजित राहिलेला टीम इंडिया हा एकमेव संघ आहे. यात स्वतः रोहितने मोठी भूमिका बजावली आहे. तो आतापर्यंत सहा सामन्यांत ३९८ धावांसह भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत. लखनऊच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याची ८७ धावांची खेळी हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.